बीड जिल्हा: सज्जा मात्र धनगरजवळका ,तलाठ्याचा कारभार पाटोद्यातुन ?

Last Updated by संपादक

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― तालुक्यातील धनगरजवळका येथील तलाठी सज्जा हा तालुक्याच्या ठिकाणी पाटोदा येथे नेण्याचे काम तलाठी यांनी केले आहे.

धनगरजवळका सज्जा मार्फत धनगरजवळका, महासांगवी,कवड़वाड़ी या गावांचा समावेश होतो तरी वर्षे दीड़ वर्ष झाले धनगरजवळका या सज्जाचा कारभार पाटोद्यात आॅफिस थाटून समंदीत तलाठी हे काम करताना दिसत आहे .यामुळे धनगरजवळका, महासांगवी, कवड़वाड़ी येथील शेतकर्याना 7/12 ,8 अ , पिककर्ज इ. कामांसाठी मोठा ञास सहन करावा लागतो तसेच पाटोदा येथील ऑफिस पण पाटोदा बसस्थानकावर पासुन एक किलोमीटर आहे त्यामुळे शेतकर्याना पदर मोड़ करून रिक्षा ने जावे लागते तर पायपीट करावी लागते त्यामुळे या तिन्ही गावांच्या शेतकर्याना शासणाच्या विविध योजनापासुन दुर रहावे लागत आहे तर सज्जा धनगरजवळका येथे घेऊन यावा असे शेतकरी यांचे म्हणणे आहे.

धनगरजवळका सज्जा हा पाटोदा येथे आहे मला माहित नाही तुम्हाला चौकशी करूण सांगतो.

― रमेश मुंड़लोम (तहसिलदार पाटोदा )