बनोटी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― राज्यात शिवसेनेची सत्ता आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून या अभियानात सर्वसामान्यांच्या वेदना समजून घेत त्यांना आधार बनण्यासाठीच अभियान राबविण्यात येत असल्याचे विधान परिषद आमदार डॉ.अंबादास दानवे यांनी शनिवारी बनोटी ता.सोयगाव येथे सांगितले. शिवसैनिकांनी सर्वसामान्यांच्या कामांसाठी पेटून उठा त्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागला तरीही चालेल परंतु शिवसैनिकात आक्रमकपणा राहिला पाहिजे त्यांनी सांगितले.
बनोटी ता.सोयगाव येथे शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात डॉ.अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बनोटी गटातील; २३ गावांचा गावनिहाय बैठकीत आढावा घेतला व उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार महिला मजुरांना छत्रीचे वितरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आमदार उदयसिंग राजपूत,समाज कल्यान सभापती(जिल्हा परिषद)मोनाली राठोड,कन्नडचे तालुका प्रमुख केतन काजे,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड,अवचित वळवळे,दिलीप मचे,लताबाई चौधरी,आदींची उपशिती होती.यावेळी विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे,आमदार उदयसिंग राजपूत,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांच्या हस्ते महिला मजुरांना छत्रीचे वितरण करण्यात आले.छत्री वितरण करतांना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले,हि छत्री नसून शिवसेनेचे शिवसेनेचे छत्र आहे या छत्राखाली महिलांना सुरक्षा आणि सेवा पुरवायच्या आहे.यावेळी प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी केले आमदार उदयसिंग राजपूत यांनी पिकविम्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.अंबादास दानवे यांनी शेतकरी हित जोपासत या खरिपाच्या वर्षात नियमित पिककर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्याला तीन लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरणार असल्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. युवसेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील,सागर खैरनार,धनंजय भास्कर,सरपंच मुलारीधर पाटील,सुभाष वाडकर,आप्पा वाघ,ज्ञानेश्वर युवरे,कैलास चौधरी,भूषण वेहेळे,भगवान पालकर,धरमसिंग सोळुंके,मंगेश सोनवणे,धनराज पवार,बाळू चौधरी,उदय खैरनार,समाधान गरुड,दादाभाऊ पवार,गौरव बिंद्वाल,प्रशांत चौधरी,शरद निकम,कुणाल महालपुरे,गणेश पालकर,अमोल खैरनार,बबलू पाटील,रमेश चौधरी,गोरख पाटील,किरण मोरे,आदींसह महिलांची उपस्थिती होती,कार्यक्रम यशस्वितेसाठी स्वप्नील पाटील,सागर खैरनार,सुभाष वाडकर,प्रशांत चौधरी,धरमसिंग सोळुंके,अतुल बोरसे,आदींनी पुढाकार घेतला होता.