पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा नगरपंचायत अंतर्गत येणारा बसस्टँड समोरील वार्ड क्रमांक ४ जाधव डॉक्टर यांच्या शेजारील गल्ली मधील नागरिकांना रस्त्यावर पाणी साचल्याने त्रास होत होता याकडे नगरपंचायत व नगरसेवकांचे कसलंच लक्षण असल्याने समाजसेवक रामदास भाकरे यांनी गांधीगिरी करत स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे त्याबद्दल सर्व नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत.समाजसेवक रामदास भाकरे यांनी गांधीगिरी करत रस्ता स्वखर्चाने करून देण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे तर नगरपंचायत व नगरसेवक यांच्या आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाटोदा नगरपंचायत च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे रस्त्या वाचून लाईट पासून स्वच्छ ते वाचून हाल होत आहेत त्याकडे नगरपंचायत म्हणा अधिकारी म्हणा नगरसेवक कुणीच लक्ष द्यायला तयार नाही वार्ड क्रमांक चार मधील रस्त्यावर साचलेले घाण पाणी येण्या-जाण्यासाठी नसलेला रस्ता पाहून समाजसेवक रामदास भाकरे यांनी स्वखर्चाने नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडी टाकून रस्ता व्यवस्थित करून घेतला गांधीगिरी मुळे नागरिक समाधानी आहेत आता यापुढे खड्डे पडल्यास गांधीगिरी नवे वेगळ्याच मार्गाने प्रश्न सोडवला जाईल याची संबंधित लोकप्रतिनिधीने नगरपंचायत च्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे समाजसेवक रामदास भाकरे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.