पाटोदा:नानासाहेब डिडुळ,उपसंपादक― तालुक्यातील चुंभळी फाटा, येथे मोठ्या प्रमाणात व्यवसायिक आहेत कोराना काळात जरी टाईम 12:30 वरून 3:30 चा शासनाकड़ून निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावनी योग्य रीतीने व्हावी त्यासाठी पाटोदा पोलीस स्टेशन चे स.पो.नि.महेश आंधळे यांनी चुंभळी फाटा येथे येऊन सर्व व्यवसायींकांना वेळेत दुकाने बंद करा.येणाऱ्या ग्राहकांना मास्कचा चा वापर करण्यास सांगा व तुम्ही देखील मास्कचा वापर करा.सोशल ड़िस्टसिंग ठेवा इ. अशा सुचना चुंभळी फाटा येथे व्यावसायिकांना दिल्या.
जर सुचनेचे पालन नाही झाले तर शासन निर्णयानुसार आपल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा ही सज्जड़ दम ही दिला.त्यांच्या बरोबर पाटोदा पोलीस स्टेशनचे हवालदार ,पोलीस काॅनीस्टेबल उपस्थित होते.