पोलीस भरती

सोयगाव तालुक्यात पोलिसांचे छापासत्र ; निवडणुका पूर्वी पोलीस सतर्क

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव दि.०२:लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर सोयगाव पोलिसांनी निवडणुका दारू विरहित होण्यासाठी पावले उचलली असून यामध्ये मंगळवारी नांदगाव ता.सोयगाव येथे गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा घालून गावठी दारू गाळपसाठी वापरण्यात येणारे रसायन आणि ४०० लिटर दारू आरोपीकडून हस्तगत केली आहे.या छाप्यात अंदाजे वीस हजार रु किंमतीची दारू जप्त करून नष्ट केली आहे.
सोयगाव पोलिसांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभरापासून अवैध दारू विक्रीवर लक्ष केंद्रित करून निवडणुका दारू विरहित होण्याकडे कल दिला असल्याने आठवडाभरापासून सोयगाव तालुक्यात पोलिसांचे दारूवरील छापे सुरु आहे.मंगळवारी घातलेल्या छाप्यात पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या पथकाने नांदगाव शिवारातील रोहिदास मोरे(वय ३५)याला दारूची गाळप करतांना रंगेहात पकडून त्याचेकडून ४०० लिटर गावरान दारू व रसायन हस्तगत करून अंदाजे वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यास ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक माधव गुंडीले,सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील,उपनिरीक्षक शरद रोडगे,योगेश झाल्टे,सुभाष पवार आदींच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *