पाटोदा(प्रतिनिधी): बीड लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आष्टी-पाटोदा शिरूर मतदार संघातील मतदारांच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे,पण याच पाटोदा तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक व भौतिक गरजांची हव्या तेवढ्या प्रमाणात कामे व विकास झाला नाही.
जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने ऊसतोड कामगार पुरवणारा तालुका म्हणून ओळख आहे,तालुक्यातील मोजके दोनचार पाणीसाठे सोडले तर सर्वत्र पाण्यासाठी वणवण करावी लागते, तालुक्यात कुठल्याही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण तालुक्यात मिळत नाही,ज्या तालुक्यातील भूमीपुत्राने पाटोद्याची ओळख जगाच्या नकाशावर दाखवली त्याच तालुक्यात एकही क्रीडासंकुलण नाही,शहरातील नागरिकांना व मुलांना मनोरंजनाचे व करमणुकीचे साधन नाही,रोजगाराच्या संधीसाठी पुणे,मुंबई, औरंगाबाद, नगर,नाशिक अशा ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे.
तालुक्यात कुठल्याही प्रकारचा लघु अथवा मध्यम उद्योग नाही, त्यामुळे मग तालुक्यातील तरुणांना हातामध्ये कोयता किंवा ट्रॅक्टरची स्टेअरिंग घ्यावी लागते, रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे,महिला असुरक्षित आहेत, एखाद्या सामाजिक किंवा राजकीय मंचावर आज महिला कुठेच दिसत नाहीत, त्या फक्त सहीपुरत्या आहेत, बाकी पतीराज सत्ता आहे,
म्हणूनच येत्या लोकसभा निवडणुकीत नवतरुणाई, सुशिक्षित नवीन मतदार यांची शैक्षणिक, शेतविषयक, आरोग्य, महिला सशक्तीकरण,रोजगार व ऊसतोड मजुरांच्या प्रश्न मार्गी लावणाऱ्यांचा उमेदवारांना पसंती देण्याचे ठरवले आहे.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ठोस पाऊल उचलले पाहिजे, जिल्ह्यात चांगले शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा व रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, व महिला सुरक्षतेसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराला पसंती द्यावी.
ऊसतोड मजूर पुत्र―इंजि.दत्ता हुले
सरकारचे शिक्षणाकडे दुर्लक्ष, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या,संविधान धोक्यात आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांवर तर कोणी बोलायलाच तयार नाही.
यावेळेस जात, धर्म, पंथ किंवा भावनिक या आधारावर मताधिकार न बजावता समाज्यामध्ये कार्यक्षम ठरणारा उमेदवार निवडा.सत्यशोधक अभ्यासक―इंजि.किरण भोंडवे
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुक पाहता आम्हा नवं युवकांचा शिक्षण, रोजगार, दर्जेदार शिक्षण, आरोग्य अशा सुविधा देणाऱ्या विकासभूम नेतृत्वाकडे मतदारांचा कल असणार आहे.
राजकीय अभ्यास―प्रदीप नागरगोजे
संत-महंताचा,ऊसतोड कामगारांचा आणि कष्टकय्रांचा हा बीड जिल्हा,’या जिल्ह्यातील लोक खुपच श्रद्धावान,कारण या जिल्ह्यात अनेक संतांनी जन्म घेतला, आणि सुगंधी विचारांची पेरणी केली,परंतु जिल्ह्यातील बेरोजगारी,ऊसतोडणी कामगार, पाणीप्रश्न, महिलांची सुरक्षा धोक्यात आहे,म्हणूनच कुठल्याही घराणेशाही जातीयवादाला बळी न पडता जिल्ह्याच्या हिताचं उमेदवार निवडून द्यावा.
शिवव्याख्याते―इंजि अतुल येवले
जिल्ह्यातील वास्तव खुप भयानक होत आहे ,रोजगार व शिक्षणासाठी जिल्हा सोडावा लागत आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे उद्योग-धंदे जिल्ह्यात येत नाहीत,जिल्ह्यातील घराणेशाहीला संपवून कुठेतरी सर्वसामान्य उमेदवाराला पसंती दिली पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते―इंजि.कृष्णा चौरे
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव व फळबागा व सुधारित शेती करण्यासाठी आर्थिक साह्य व विविध योजना राबवणाऱ्या व सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या उमेदवारास आपलं मत द्या.
शेतकरी पुत्र―राज घुमरे
उसतोड मजुरांच्या मुलाची मुलीची शिक्षणाची जबाबदारी घेणारा तसेच उसतोड मजुर यांची संख्या कमी व्हावी उसतोडणीला न जाता त्यांच्या गावीच जर पाण्याची सोय झाली तर कमितकमी जनावरे तरी जगवुन आपला उदरनिर्वाह करतील यासाठी जो नेता झटेल त्यास निवडुन दिले पाहिजे. सांगाय गेल तर खुप काही करु शकतात पण काय करणार…