पाटोदा (प्रतिनिधी): सध्या संपूर्ण पाटोदा तालुका हा दुष्काळात होरपळत असून ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची सासरवाडी असलेले व विशेष म्हणजे सासरे गावचे सरपंच असलेल्या तालुक्यातील धनगर जवळका या ठिकाणी ऐन दुष्काळात ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरले जात असून ज्याठिकणी विहीर व कूपनलिका अधिग्रहन करण्यात आली आहे त्याचे पाणी काही ठराविक लोकांनाच मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करा या मागणी साथी धनगरजवळका येथील ग्रामस्थांनी २९ एप्रिल रोजी बीड नगर रोडवर धनगरजवळका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
पाटोदा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील ज्याठिकाणी कुपनलिकेचे अधिग्रहण केले आहे ते रद्द करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावात टॅकर द्वारा पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा त्याच प्रमाणे अधिग्रहण करण्यात आलेल्या ठिकाणचे अत्यापपर्यंत ग्रामस्थांना पाणीच मिळाले नसल्यामुळे त्याचे देयके अदा करण्यात येऊ नये. तरी प्रशासनाणी ग्रामस्थांची पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
पोलिसाकडून आंदोलकांना नोटिस
सदरील आंदोलनाचे लेखी निवेदन घेवून जाणार्या आंदोलकांना आंदोलन न करण्यासंदभात नोटिस देण्यात आली असून आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे
लवकरात लवकर टँकर सुरू करावेत