बीड दि. ०२: नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या शेख तौसिफ या आपल्या भूमीपुत्राचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, त्यांच्या कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पाटोदा येथील शेख तौसिफ शेख आरेफ हा जवान शहीद झाला, या घटनेबद्दल पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शेख तौसिफ यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेख तौसिफ यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही अशा शब्दांत ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
sanap mahadeo
hi