आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.०२:निमखेडी ता.सोयगाव येथे जलस्वराज्य योजनेतून नुकत्याच सुरु असलेल्या पाझर तलावाचे नित्कृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्यावर संबंधित ठेकेदाराने चक्क रात्रीतून काम करून पाझर तलावाचे काम बुधवार रात्रीतून पूर्ण केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.
निमखेडी गावालगत स्थानिक स्तर विभागाकडून पाझर तलावाचे काम मंजूर करण्यात आले असतांना,या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यावर संबंधित ठेकेदाराकडून नित्कृष्ट दर्जाची माती मिश्रित वाळूचा वापर करून काम करण्यात येत असल्याने ग्रामपंचायत सदस्य नाना विनायक पाटील यांनी तहसीलदार सोयगाव यांना तक्रार देवून सदरील काम बंद पाडले होते,परंतु संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थ गाढ झोपेत असतांना बुधवारी महाराष्ट्र दिनाच्या सुटीच्य रात्री या कामाला पूर्णत्वाचा आकार देवून चक्क धरणातील गाळाचा वापर करून पाझर तलावाची भिंत बांधली आहे.त्यामुळे निमखेडी परिसरात खळबळ उडाली होती.रात्रीतून काम करणाऱ्या या ठेकेदारावर कारवाई करून या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.निवेदनावर परमेश्वर शिंदे,गजानन शिंदे,सुदाम पाटील,समाधान राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.
धरणाच्या गाळात संरक्षण भिंत-
दरम्यान निमखेडी पाझर तलाव क्रमांक-१ ची संरक्षण भिंत आणि सांडव्याचे काम संबंधित ठेकेदाराने वाळूचा वापर न करता,चक्क धरणातील गाळ काढून भिंत उभी केल्याने निमखेडी गावाला धोका निर्माण झाला आहे,कमी अधिक स्वरूपाचा पावूस झाल्यास पाझर तलाव फुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सोयगांव तालुक्यातील असे बर्याच धरणांचे कामे एका रात्रीतून पुर्ण करण्यात आलेली आहेत अशा गंभीर प्रकरणाबाबत जि,प,सि,ओ, मॅडम औरगांबाद यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार करून देखिल ceo, यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही पहुरी बु,येथील पाझर तलावाबाबत लेखी तक्रार करण्यात आलेली आहे सदर काम जि,प,सदस्या पुष्पाताई काळे यांच्या निधीतले आहे तरी जि,प,ceo, झोपेचे सोंग घेत आहे