सामाजिक बांधिलकी जोपासत दत्त सेवाभावी संस्थेचा पुढाकार
अंबाजोगाई (प्रतिनिधी): जिल्ह्यात सतत दुष्काळ पडत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे.अशा परिस्थितीत मुलामुलींच्या लग्नाचा खर्च करण्यास अनेक पालक व कुटुंबे ही असमर्थ ठरत आहेत. त्यातूनच शेतकरी बांधवांनी उपवर मुलींचा विवाह करता येत नसल्याने आत्महत्येचे मार्ग स्विकारले आहेत. तेंव्हा ग्रामिण भागातील शेतकरी,शेतमजुर व मध्यवर्गीय कुटुबांना सहकार्याच्या भावनेतून व सामाजिक बांधिलकी म्हणुन दत्त सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवार,दि.17 मे रोजी सायंकाळी 5 वाजता सोमेश्वर विद्यालय घाटनांदुर येथे सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.या विवाह सोहळ्यात पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन दत्त सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्या करीता नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे वधु-वराचे दोन पासपोर्ट फोटो,वयाचा दाखला (टी.सी.झेरॉक्स), आधार कार्ड,रहिवाशी दाखला यासह नोंदणी फी द्यावयाची आहे. तसेच संस्थेच्या वतीने वधुसाठी शालु, वरासाठी ड्रेस (शेरवाणी) आणि संसार उपयोगी वस्तु देण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी आयोजक, दत्त सेवाभावी संस्था, बागझरीचे अध्यक्ष प्रशांत दहिफळे (मो- 9822376332), हणुमंत गायकवाड (उपाध्याक्ष-मो. 9405100533), अशोक पालके (सचिव- मो.9604946994), कमलाकर मिसाळ (मो- मो. 9881463904), अरविंद मिसाळ (मो- 9657659463),वसंत उदार (मो- 9561423377) या क्रमांकांवर उपवर वधु-वरांच्या इच्छुक पालकांनी संपर्क साधावा.असे आवाहन दत्त सेवाभावी संस्था बागझरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
1 thought on “१७ मे रोजी घाटनांदुर येथे सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन”