आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव दि.१०: निमखेडी,आणि तिखी या दोन गावांना पाणी टंचाईची गंभीर झळ बसत असतांना तब्बल पंधरा दिवसापासून पाठविण्यात आलेले टँकरचे प्रस्ताव अद्यापही सिल्लोडला धूळखात पडून असल्याने पाणीटंचाईमध्ये होरपळत असलेल्या या दोन गावातील ग्रामस्थांना विहिरीत पोहऱ्यात पाणी शोधण्याची वेळ आली आहे.दरम्यान टँकरची प्रतीक्षा करण्यात या ग्रामस्थांच्या रस्त्याला लागलेल्या नजरा आता विहिरीत डोकावल्या आहे.
महिनाभरापासून पाण्याचा थेंब नसलेल्या सोयगाव तालुक्यातील तिखी,निमखेडी गावात यंत्रणेकडून पाठविण्यात आलेले टँकरचे प्रस्ताव मंजुरीविना सिल्लोडला पडून आहे.दरम्यान गावात टँकर येईल आय आशेने ग्रामस्थांच्या रस्त्याकडे लागलेल्या नजरा आता विहिरीत वळल्या असल्याने विहिरीतील थेंब थेंब पाणी पोहऱ्यात आणण्यासाठी ग्रामस्थांचा भर उन्हातील प्रयोग आहे.दरम्यान तिखी ता.सोयगाव गावातील पाण्याची आवक वाढलेल्या सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण केल्यास व गाळ काढल्यास पाण्याची आवक वाढून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्ब्न सुटू शकेल अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली असता,विहिरीच्या कामासाठी सुरुंग स्फोट घेतांना विपरीत घटना घडल्यास मागणी करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करू अशी धमकीच ग्रामस्थांना दिल्याने ग्रामस्धांनी या मागणीतून काढता पाय घेतला होता,परंतु जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने मात्र दुसरीकडे विहीर खोदकामासाठी अयोग्य असल्याचा लेखी अहवाल जिल्हा परिषदेला देवून यातून पाणी पुरवठा विभागानेही काढता पाय घेतल्याने टंचाई स्थितीत विहिरीचे खोदकाम संबंधित विभागाने मागणी करूनही प्रलंबित ठेवल्याने येथील ग्रामस्थांना पिण्याचं पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार जिल्हा परिषद पाणी पुरवठा आणि ग्रामसेवकाने केला आहे.टंचाई काळात वेळ मारून नेणाऱ्या ग्रामसेवक आणि पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खासगी टँकरद्वारे तरुणाची ग्रामस्थांना मदत-
दरम्यान तिखी गावातील तरुण शेख नईम या तरुणाने खासगी टँकर शेतातील विहिरीतून भरून आणून ग्रामस्थांना मोफत पाणी वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याने या तरुणाच्या उपक्रमामुळे तिखी गावातील पाणी टंचाईवर नितंत्रण आले आहे.
आमच्या गावाची व्यथा मांडल्याबद्दल .आभारी आहोत.