सोयगाव : ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सुभाष सरीचंद पवार रा.उप्पलखेडा ता सोयगाव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांच्या विशेष पथकाला उप्पलखेडा शिवारात झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने सायंकाळी पाऊनेपाच वाजता जुगार सुरू असताना उप्पलखेडा शिवारात धाड टाकली. यावेळी शेख शकुर शेख मुसा, दिलीप भगवान पवार दोघे राहणार उप्पलखेडा, शेख माहेबूब शेख जैनोद्दीन रा.बनोटी, फकिरा धोंडू सोनवणे रा. निंभोरा, अनिल रामचंद्र बागड रा.तितुर हे पाचजण पैसे लाऊन झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले होते.यांच्याकडून रोख रक्कम ३९४९० रुपये, चारचाकी बोलरो गाडी व तीन दुचाकी असा एकूण ४३२४९० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
औरंगाबाद ग्रामिणचे पो.ना शेख, पो.ना राठोड, पो.कॉ गायकवाड आणि सोयगाव पोलीस ठाण्याचे पो.ना सुभाष पवार, दिलीप तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या या धडक कारवाईने बनोटी सर्कल मधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास दिलीप तडवी हे करीत आहे .व सोयगाव तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करावे हे या पुढे पण अशीच धडक मोहीम सुरू ठेवावी अशी जनसामान्यांची मागणी तूण सुर धरत पोलीस प्रशासन या गोष्टी कडे लक्ष द्यावे. या कारवाईमुळे अवैध धंदे धाबे दणाणले आहेत.पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल सामान्य जनतेत समाधान व्यक्त होत आहे .