डॉ. देवानंद पाटील यांची प्रतिथयश सिंजेंटा कंपनीत उच्च पदावर निवड
सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―कृषी क्षेत्रातील अग्रगण्य आशा सिजेंटा कंपनीमध्ये एग्रो केमिकल विभागात लीड सायंटिस्ट म्हणून 30 उच्चशिक्षित स्पर्धकांमधून ही निवड करण्यात आली असून दक्षिण आशिया विभागाची जबाबदारी डॉक्टर देवानंद पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
एम एस्सी गोल्ड मेडलिस्ट आणि ऍग्रो फॉर्मुलेशन विषयात पाच आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंध (रशिया अमेरिका वगैरे) प्रकाशित असलेला देवानंदने अगोदर हेरंब यूपीएल इंडो अमेंस कंपनीमध्ये ऍग्रो केमिकल्स फॉर्मुलेशन विभागातील जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळलेली आहे. त्यामुळेच सिंजेंटाच्या या महत्वपूर्ण पूर्वपदावर देवानंदची सुयोग्य निवड करण्यात आली आहे.
देवानंदला पुढील वाटचालीसाठी सुनील रंगराव पाटील, ज्ञानेश्वर धोंडू युवरे व मराठा प्रतिष्ठान तर्फे यांनी त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.