जळगाव जिल्हाजामनेर तालुकाब्रेकिंग न्युज

जामनेर: संतोषीमातानगर जि.प.शाळेत वृक्षदिंडी व पालकसभा उत्साहात संपन्न

जामनेर:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―पहूरपेठ ता.जामनेर येथील संतोषीमातानगर जि.प.प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व पालकसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सुरुवातीला शाळेच्या परिसरात वृक्षदिंडी टाळ मृदुंग सहित ‘झाडे लावा ,झाडे जगवा’ घोषनामाच्या गजरात काढण्यात आली.मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी स्वत: मृदुंग वाजविले.पालखीची उत्कृष्ट सजावट व विद्यार्थ्यांचा आकर्षक असा पोशाख आणी प्रत्येक मुलाच्या डोक्यातील टोपी यामुळे वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली.
वृक्षदिंडी नंतर पालकसभा मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यांनी उपस्थित पालकांना विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात कागदपत्रकांची करावयाची पुर्तता तसेच विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकवणे बाबत आणी शैक्षणिक गुणवत्ता बाबत सविस्तर माहिती देली.
यावेळी सुभाष कुंभार यांची जामनेर येथे नायब तहसिलदारपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेच्या वतीने माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे यांच्या हस्ते शाल ,गुलाबपुष्प देवून करण्यात आला.
पालकसभेच्या प्रसंगी नायब तहसिलदार सुभाष कुंभार ,मा. सरपंच तथा मा.कृषी सभापती जि.प.जळगाव प्रदिप लोढा , मा.पं.स.सभापती बाबुराव घोंगडे ,पहूरपेठ सरपंचपती रामेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या बाबतीत व शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम प्रसंगी भारतीय जीवन बिमा निगमचे विकास अधिकारी संजय देवरे यांनी बिमा स्कुल संदर्भात पालकांना सविस्तर माहिती देवून विद्यार्थ्यांचा बिमा उतरवण्याचे आवाह केले. ग्रामपंचायत तर्फे शाळेला वृक्षरोपणासाठी दिलेल्या वृक्षांचे वाटप पालकांना करण्यात आले. पालकसभे नंतर शालेय आवारात वृक्षारोपण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपसरपंच श्याम सावळे ,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती निर्गुणा महाजन,सदस्य राजेंद्र धुळसंधीर ,फिरोज तडवी,शरद बेलपत्रे ,भारत पाटील,संजय पांढरे ,कैलास जाधव ,विनोद पांढरे ,काशिनाथ चव्हाण ,संतोष बनकर ,तुकाराम नवघरे ,शिवाजी पाटील ,ज्योती भिवसने पालक इत्यादी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षदिंडी व पालक सभा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सुवर्णा मोरे,चित्रलेखा राजपुत ,
दिनेश गाडे,रत्नमाला काथार,रोहिणी शिंदे ,मनिषा राऊत व शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button