पोलीस भरती

लोकमिञचे संपादक हमीदखान पठाण यांना बंधुशोक

पाटोदा:शेख महेशर―पाटोदा येथील लोकमिञचे संपादक तथा पञकार हमीदखान पठाण याचे मोठे बंधु महेमुदखान युसुफखान पठाण वय ४८ वर्षे यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने आज दि. ०९ /०९ /२०१९ रोजी ११ वाजता निधन झाले.
महेमुदखान पठाण हे पाटोदा शहरात बार्शी रोड वर नगर पंचायत समोर हाॅटेलचा व्यवसाय करीत होते. महेमुदखान पठाण हे पाटोदा शहरात सर्वांशी प्रेमाचे व आदराने वागायचे व मनमिळाऊ स्वभावामुळे ते पाटोदा शहरात सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या वर आज सायंकाळी मगरीब नमाज नंतर दर्गावाली मशिद कब्रस्थान मध्ये दफनविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे तीन भाऊ असा परिवार आहे. महेमुदखान पठाण पञकार हमीदखान पठाण यांचे मोठे बंधु व पाटोदा नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष नय्युम पठाण यांचे पुतणे होते.पठाण कुटुंबीयांच्या दु:खात आठवडा विशेष परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *