45 व्या विज्ञान प्रदर्शनातील प्रथम विजेते सृष्टी व सुमोद देशमुख भावंडांचा ममदापुर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती व भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.खोलेश्‍वर प्राथमिक विद्यालयात नुकतेच 45 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन आयोजित करण्यात आले होेते.या प्रदर्शनात ‘बहुगुणी पोषण बाग‘ हे उपकरण तयार केल्याबद्दल सुमोद सुधाकर देशमुख व सृष्टी सुधाकर देशमुख या भावंडांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.या भावंडांचा ममदापुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शनिवार,दि.7 डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममदापुरचे सरपंच आरविंद बुरगे तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख आर.डी.गिरी, उपसरपंच धर्मराज देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वृक्षमित्र सुधाकर देशमुख,महिला बचतगट कार्यकर्त्या मोहिनी देशमुख, नरारे सर,ग्रामपंचायत सदस्य अनिल देशमुख,मेजर तानाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. अनुजा खरबडे,तनुजा खरबडे या भगिनींनी स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक टी.जी.बुक्तर यांनी केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमोद देशमुख,दृष्टी देशमुख, सुधीर कुलकर्णी,खोसे सर यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी उपसरपंच धर्मराज देशमुख,ग्रामपंचायत सदस्य अनिल देशमुख,तानाजी शिंदे,आर.डी.गिरी,सुधाकर देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी टिळे,शिक्षक रामराजे आवाड,नांदडीचे सरपंच बलभीम शिंदे,नामदेव नरारे, व्यंकटी यादव,जीवन देशमुख, मंगल लोमटे,रविता मारवाडकर,विजयमाला सातभाई,कुलकर्णी मॅडम, सिताबाई धपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोप सरपंच अरविंद बुरगे यांनी केला.या कार्यक्रमास ममदापुर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *