अमळनेर गटात भाऊसाहेब भवर यांची जोरदार मोर्चे बांधणी

भाऊसाहेब भवर यांना सुरेश धस टिकिट देतील का
जनता मागणी करत आहे.
भाऊसाहेब भवर हे आमदार सुरेश धस यांचे समर्थक असून गेल्या अनेक वर्षापासून ते अमळनेर गटात सक्रिय
पाटोदा तालुक्यातील इच्छुक उमेदवार भाऊसाहेब भवर यांनी गटात छोट्या मोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावला असून त्याच्या माध्यमातून त्यांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
(प्रतिनिधी) राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून इच्छुकांनी आप आपल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे.
पाटोदा तालुक्यातील इच्छुक उमेदवार भाऊसाहेब भवर यांनी गटात छोट्या मोठ्या कार्यक्रमांचा धडाका लावला असून त्याच्या माध्यमातून त्यांनी तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
भाऊसाहेब भवर हे आमदार सुरेश धस यांचे समर्थक असून गेल्या अनेक वर्षापासून ते अमळनेर गटात सक्रिय आहेत.
अशातच त्यांच्या एका टॅगलाईनची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
गोर गरिबांची पावर, भाऊसाहेब आण्णा भवर ही थिम घेऊन भाऊसाहेब भवर हे लोकांच्या समोर जात आहेत.
अमळनेर गटात त्यांनी या अगोदर ही अनेक सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भव्य कुस्ती मैदान असो की अनेक शाळात वही वाटप असो भवर यांनी विविध कार्यक्रम, गाठी भेटी, दिवाळी स्नेह मेळावा असे विविध उपक्रम राबवून जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
कुस्तीचा फड भरवणारे भवर हे राजकीय फड कशा पद्धतीने पार पाडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमळनेर गटात अनेक उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.
सध्या तरी भवर यांची मोर्चे बांधणी जोरात दिसत आहे.
पण येणारा काळ सांगेल की सुरेश धस हे कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ घालतात व मतदार राजा कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालेल.
सध्या तरी भवर यांच्या आकर्षक टॅगलाईन ने परिसरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.