अखेर लिंबागणेश–पोखरी–पालवण रस्त्यावरील खड्ड्यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या स्वखर्चातून दुरुस्ती सुरू – डॉ. गणेश ढवळे

LIVE
Updates: 1
Newest | Oldest
• संपादक

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निकृष्ट रस्त्यांमागे अभियंता–कंत्राटदारांची मिलिभगत : डॉ. गणेश ढवळे

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे रस्तेकाम होत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळते.
रस्त्यावरील कामाचा बोर्ड आणि वास्तविक स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. अनेक ठिकाणी बोर्डावर रस्ता दोन वर्षांपूर्वीच झाल्याचे नमूद असूनही प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे.

लिंबागणेश : (दि. २३) तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पालवण ते लिंबागणेश या २४ किमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र पडलेले खोल खड्डे व भगदाडांमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अपघातांचे प्रमाणही वाढले होते.

गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी खड्ड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून प्रशासन आणि कंत्राटदाराचा निषेध नोंदविला होता. दरम्यान मदन मस्के कन्स्ट्रक्शन, बीड यांनी दुरुस्ती कालावधी संपल्याचे कारण देत जबाबदारी नाकारली होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्ड्यांचे तात्पुरते डांबरीकरण सुरू केले असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आहेत.

“दुरुस्ती कालावधी संपला, पण ग्रामस्थांची गैरसोय पाहवत नाही — स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती सुरू” : राजेंद्र मस्के

आहेर–धानोरा–वरवटी–लिंबागणेश हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता अतिवृष्टीमुळे अत्यंत खराब स्थितीत आला होता. खोल खड्डे, पाण्याचे साचलेले तळ, नष्ट झालेले पृष्ठभाग यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन गैरसोयी लक्षात घेऊन स्वखर्चाने दुरुस्तीकार्य सुरू केल्याचे मस्के यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निकृष्ट रस्त्यांमागे अभियंता–कंत्राटदारांची मिलिभगत : डॉ. गणेश ढवळे

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे रस्तेकाम होत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळते.
रस्त्यावरील कामाचा बोर्ड आणि वास्तविक स्थिती यामध्ये मोठी तफावत आहे. अनेक ठिकाणी बोर्डावर रस्ता दोन वर्षांपूर्वीच झाल्याचे नमूद असूनही प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आहे.

कंत्राटदार दुरुस्ती कालावधीतील तफावतीचा गैरफायदा घेत “कालावधी संपला” असे सांगून जबाबदारी झटकत असून ग्रामस्थांची व शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला.
ग्रामस्थांनी सजग राहून अशा कामांवर देखरेख ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२