सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
घोसला सेवासंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या चारशे कर्जदार शेतकऱ्यांना वीस टक्के वाढीव कर्जाचा लाभ मिळाल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांनी मंगळवारी केली.त्यामुळे सोयगाव तालुक्यात कर्ज वसुलीत अव्वल ठरलेल्या घोसला सेवासंस्थेला कर्ज वाढीवचा तालुक्यात दर्जा मिळाला आहे.या संस्थेच्या वसुलीची आकडेवारी वीस टक्के वाढीव योजनेत पात्र ठरली आहे.त्यामुळे चारशे कर्जदार शेतकऱ्यांना तातडीने वीस टक्के वाढीव देण्याचा निर्णय सेवा संस्थेच्या सभेत घेण्यात आला आहे.
जेष्ठ शेतकरी विक्रम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.यावेळी माजी सभापती चंद्रकांत पाटील,सचिव भीमसिंग पाटील,अध्यक्ष शरद महाजन,प्रकाश पाटील,कैलास पाटील,अमृत गव्हांडे,भरत गव्हांडे,अण्णा पहारे,एकनाथ बावस्कर,मंगलाबाई ढमाले,रंजना गव्हांडे,ज्ञानेश्वर युवरे,सोमनाथ पाटील,गणेश गवळी,आदींसह रमेश वाघ,एकनाथ बोरसे,श्रावण युवरे,शिवदास पाटील,सुभाष गवळी,शशिकांत पाटील,दिगंबर पाटील,धनराज वाघ आदींची उपस्थिती होती.
सभेचा अध्यक्ष शेतकरी-
दरम्यान शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविण्यात येणाऱ्या सेवासंस्थेच्या सवर्साधारण सभेचा मान घोसला संस्थेने शेतकऱ्याला दिला आहे.त्यामुळे सर्वसाधारण सभेचा अध्यक्ष शेतकरी झाला होता.