पाटोदा:गणेश शेवाळे― पाटोदा तालुक्यातील गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे पाटोदा तालुक्यातील पारगाव, अमळनेर,डोगरकिन्ही,गटातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीच्या वतिने पाटोदा तहसिलला निवेदन देण्यात आले पाटोदा तालुक्यातील हाजारो एकरावरील पीक धोक्यात आले असल्याने बळीराजा संकटात सापडल्या आहे.पाटोदा तालुक्यात होणाऱ्या आवकाळी पाऊसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील मका, बाजरी, सोयाबीन, कपाशी, कांदे, कांद्याचे, रोप, टोमॅटो, भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच काढून ठेवलेले पीक सुद्धा वाया गेले असल्याने शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी सण देखील साजरा करण्यात आला नाही दिवाळीच्या सणात पावसाने जोर धरल्यामुळे शेतातील तयार पिके काढता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले सततच्या पावसामुळे शेतातील मका आणि बाजरीचा चारा सुद्धा सडून गेल्यामुळे जणावाराच्या चाऱ्याचा सुद्धा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन मका सोयाबीन या पिकांना कोंब फुटले आहेत पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच पीक सडून चालले असल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत तात्काळ द्यावी काढणी राहिलेले सोयाबीन कुजले असुन शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावा तसेच 2018 सालचा हरभरा पिकांचा मंजूर झालेला विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ टाकावा पुनर्घटना साठी बँकेत जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या फाईल लवकर मंजूर कराव्यात वातावरणामुळे पशुधनात रोगराई पसरली असून त्यांचे उपचार करण्यासाठी शासकीय दवाखान्यामध्ये चोवीस तास डॉक्टरने हजर राहावे अशा मागण्या निवेदनात असून दिवाळी मुळे तहसील ला सुट्टी असतानाही प्रशासनाला जाग यावी म्हणून शेतकऱ्यांनी पाटोदा तहसील पुढे ठिय्या आंदोलन करून तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी कडे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्याची दखल न घेतल्यास राष्ट्रीय कांग्रेस पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय काँग्रेस नेते उमर चाऊस व काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे यांनी दिला यावेळी चक्रपाणी जाधव,राजाभाऊ देशमुख, कॉम्रेड नागरगोजे,भाई विष्णुपंत घोलप,बाबुराव जाधव,युवराज जाधव,गोविंद जाधव, राहुल बामदळे, सय्यद साजेद, बाळू ढवळे,अण्णासाहेब राऊत, युवराज जाधव,आनंदा भोसले, किशोर निंबाळकर, दीपक शिंदे, चांगदेव निंबाळकर, राहुल सोनवने सह शेकडो शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.