Offer

बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई गोपिनाथराव मुंडे यांच्या कार्यतत्परतेमुळे,अभ्यासपुर्ण पाठपुराव्यामुळे नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेसला मिळाला घाटनांदूर स्थानकावर थांबा..!

आठवडा विशेष|बीड प्रतिनिधी

नगर–बीड–परळी रेल्वे मार्गासाठी सतत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करत बीडकरांच्या अस्मितेचा रेल्वे प्रश्न मार्गी लावणाऱ्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यातील अजून एक रेल्वे प्रश्न मार्गी लावला आहे.

परळी तालुक्यातील घाटनांदूर येथील रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी घाटनांदूर व परिसरातील अनेक गावांच्या नागरिक , विद्यार्थी आणि प्रवाशांनी हि मागणी लावून धरली होती. घाटनांदूर व परिसरातील नागरिकांनी खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देऊन नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेस रेल्वेला थांबा मिळवून देण्याची मागणी केली होती.

खा.मुंडेंनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करत नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेसला थांबा मिळवून दिल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

घाटनांदूर परिसरातील नागरिकांनी मानले खा. प्रितमताईंचे आभार

नांदेड –बेंगलोर एक्स्प्रेसला घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा हि अनेक दिवसांची मागणी खा.प्रितमताईंमुळे मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी कर्तृत्ववान खासदार प्रितमताईंचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button