हिंदी अध्यापक संघ मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी डॉ.राजकुमार कांबळे यांची नियुक्ती

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापक संघ,औरंगाबाद विभागाच्या अध्यक्षपदी डॉ.राजकुमार कांबळे यांची नेमणूक करण्यात आली.या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॉ.मिलिंद कांबळे यांनी दिले आहे.

राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन हिंदी अध्यापक संघाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुणे येथे झाली.सदरील बैठकीत राज्यभरातील विभागीय निवडी करण्यात आल्या.हिंदी भाषेविषयी येणाऱ्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी लढा उभा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.हिंदी विषयासाठी करण्यात आलेल्या विभागवार निवडीमध्ये प्रा.संजय पवार (पुणे विभाग),डॉ.वंदना पावसकर (मुंबई विभाग),डॉ. राजकुमार कांबळे (औरंगाबाद विभाग),प्रा.संजय गावकर (कोकण),डॉ.विनोद डोमकावळे (अमरावती),प्रा.अजय रूखियाना (नागपूर),प्रा.मौजन आर.आय.(लातूर),प्रा.सुदाम पाटील (नाशिक ),प्रा.नंदा गायकवाड (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
डॉ.राजकुमार कांबळे हे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष आहेत.सतत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते कार्यरत असतात.वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय, अंबाजोगाई (जि.बीड) येथे गेल्या 25 वर्षांपासून ते हिन्दी विषयाचे अध्यापन करीत आहेत.एक अभ्यासू व्यक्तीमत्व आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून डॉ.कांबळे हे सर्वञ ओळखले जातात.त्यांच्या या निवडीचे संस्थेचे सचिव राजेंद्रजी लोमटे,उपाध्यक्ष सतिश (नाना) लोमटे,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.आखिला सय्यद गौस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद चे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांनी स्वागत केले आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन प्रध्यापक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा.सत्येंद्र पाटिल,सचिव चंद्रकांत मुळे आदींसहीत मिञ परीवाराने अभिनंदन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *