परळी:आठवडा विशेष टीम―परळी तालुक्यातील मौजे दाऊतपुर शिवारात झाडाला एका युवकानी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहिती अशी कि थर्मल काॕलनी येथील रहिवासी असलेला नितिन दिलिप मुंडे या 33 वर्षीय युवकाने परळी गंगाखेड रोड वरिल दाऊतपुर शिवारात स्वताच्याच नाईटपॕन्टच्या साह्याने झाडाला गळफास घेतल्याची माहिती आली आहे.घटनास्थळी मोटार सायकल क्र.MH-44-X-0963 आहे. घटनास्थळी संभाजी नगरचे पोलिस अधिक तपासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान कालच संभाजी नगर पोलिस ठाण्यात मयताच्या पत्नीने आपला पती मिसिंग झाल्याची
तक्रार दिल्याची माहिती समजते आहे.