बीड:आठवडा विशेष टीम―बीड तालुक्यातील मौजे सोमनाथ वाडी येथील लोकसंख्या अंदाजे ४०० असून केवळ एक हातपंप असल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावातील भोईभार-इंगोले यांच्या खाजगी मालकीच्या पुरातन विहीरीत दगडी पायऱ्या उतरून जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागते, तिव्र पाणी टंचाईने एकीकडे जोर धरलेला असतानाच ग्रामस्थांच्या जिवाला मात्र घोर लागल्याची भावना ग्रामस्थांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलून दाखवली,
अंकुश सोमीनाथ जाधव (ग्रामस्थ ):
महिना झालं गावातील हातपंप बंद पडलाय, एकदा हातपंप दुरूस्तीला गाडी आली होती पण दोन नळ्या कमी पडलेल्या पाणी येत नाही. जिवघेणी कसरत जरी असली तरी पाण्यासाठी हे सगळं करावंच लागतं दुसरा ईलाज नाही.
इंगोले-भोईभार ( विहीर मालक):
गावाला पाण्याची चणचण भासते. ही आमची जरी खाजगी जुनी दगडी विहीर कसली तरी १२ महीने आणि उन्हाळ्यात तर रात्रंदिवस पाणी नेण्यासाठी लोकं येतात.आम्ही कोणालाच अडवत नाही, नाही म्हणत नाही.लोकांची तहानभागते यातच आम्हाला समाधान आहे.
आकाश शेळके ( सरपंच ):
शासनाच्या २०११ च्या जणगणनेनुसार गावची लोकसंख्या ४००आहे ,शासन निकषानुसार लोकसंख्या कमी असल्यामुळे गावाला पाणीपुरवठा योजना देता येत नाही, गावात एक हातपंप आहे, पाणीटंचाई दूर करण्यासाठी पंचायत समितीला टँकर टँकरचा प्रस्ताव दिला आहे.
डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते :
गावची लोकसंख्या जरी २०११ चर्या जणगणनेनुसार ४०० असली तरी त्यात २०२० पर्यंत ९ वर्षामधे बरीच वाढ झालेली असल्यामुळे आणि पाणीटंचाईची भविष्यातील तिव्रता लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून पुन्हा लोकसंख्येचा आढावा घेऊन पाणीपुरवठा योजना गावाला मंजूर करण्यात यावी यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांच्या मार्फत मा.उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, मा.गुलाबरावजी पाटील साहेब, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री , मा.हसन मुश्रीफ साहेब, ग्रामविकास मंत्री आणि मा.धनंजयजी मुंडे साहेब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.
News