माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर धनराज गुट्टे यांचा पहिला राजीनामा

मुंबई:आठवडा विशेष टीम― भाजपने विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक , भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष श्री धनराज गुट्टे यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाचा पहिला राजीनामा देऊन पंकजाताई मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा राग व्यक्त केला आहे . राज्यभरात अनेकजण राजीनामे देत आहेत पण पहिला नंबर लागला तो धनराज गुट्टे यांचाच...
श्री गुट्टे हे माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक म्हणून गेल्या 12 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत . श्रीमती मुंडे वर जर कुणी साधी टीका जरी केली तर गुट्टे महाराष्ट्र भर आंदोलन करून त्या व्यक्तीचा निषेध करतात. कट्टर समर्थक कसा असावा तर तो धनराज गुट्टे सारखा अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते . विधान परिषद तिकीट कापल्यानंतर पंकजा मुंडे साठी राजीनामे देणारे पाहिले मुंडे सैनिक ठरले आहेत धनराज गुट्टे .
त्याबद्दल सर्व मुंडे समर्थकाकडून त्यांचे कौतुक होत आहे . श्री गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले ' जगतोय ताई साठी मरणार ही ताई साठी' ' असे त्यांनी सांगितले.

2 thoughts on “माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर धनराज गुट्टे यांचा पहिला राजीनामा

  1. बीड जिल्ह्यातील कोणी नेता राजीनामा देणार आहे की नाही ?

  2. युवा नेते खूप छान असेच ताईसाहेबांसोबत कायम राहा आपल्यासारखा माणूस ताईसाहेबांचा कार्यकर्ता आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Previous post औरंगाबाद: सोयगावकरांना दिलासा ! सुरतमधील पॉझिटिव्ह घरमालकाच्या संपर्कातील चार मजुरांचा अहवाल निगेटिव्ह
Next post पाटोदा: जवळाला ग्रामपंचायत यांच्या वतीने ऊसतोड मंजूराना मोफत किराणा सामान किट वाटप