पोलीस भरती

बीड: आणखी एक हजार दे, साहेबांना द्यावे लागतात ! शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील लाचखोरी चव्हाट्यावर ; लाचखोर कर्मचारी तडकाफडकी निलंबित

बीड:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनमध्ये पकडलेली दुचाकी सोडण्यासाठी एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला पैसे मागतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील लाचखोरी सोमवारी (दि.१८) चव्हाट्यावर आली आहे.ही गंभीर बाब असून अशा प्रकारामुळेच पोलिसांची जनमानसात प्रतिमा मलिन होत आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी संबंधित लाचखोर कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले.
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लॉकडाऊन दरम्यान जप्त केलेल्या वाहनांच्या आणि वाहन मालकाच्या जामीनसाठी एका पोलिसाने पैसे घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तातडीने बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी ठाण्यास भेट देऊन चौकशी करावी. व अहवाल माझ्यासमोर सादर करावा असे आदेश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार आणि पोलीस अधिकारी यांच्या ग्रुपवरून संबंधितांना दिले होते. दरम्यान, व्हिडिओतील पोलिसाने १ हजार रुपये स्वीकारल्याचे स्पष्ट होत असून आणखी एक हजार दे, साहेबांना द्यावे लागतात असंही तो व्हिडीओत म्हणत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *