पोलीस भरती

पाचोरा: वीज पडल्याने सातगांव येथील गायीचा मृत्यू

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील वामन शेनफडू पाटील यांच्या मालकीची गाय आणि वगार दि. १० रोजी रात्री १ वाजता वीज पडून ठार झाल्याची घटना धडली. निसर्गाच्या सानिध्यात आणि आकाशाच्या छताखाली बळीराजा जीवन जगत असतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. सध्या मृगनक्षत्र असल्याने, विजांच्या कडकडाने वादळ आणि पावसामुळे वीज पडल्याने सातगाव (डोंगरी) येथील वामन शेनफडू लोखंडे यांच्या मालकीची गाय आणि वगार निंबाच्या झाडाखाली बांधलेली असतांना दि. १० रोजी रात्री १ वाजता जोरदार विजेचा आवाज होऊन लोखंडे यांच्या निंबाच्या झाडाखाली बांधलेल्या गाय आणि वगार यांच्यावर पडली. यावेळी दोन्ही जनावरे ठार झाली. यावेळी पन्नास फुटावर पत्राच्या शेडमध्ये झोपलेले वामन लोखंडे, ज्ञानेश्वर तुळशीराम डांबरे, संजय शामराव सोमासे, प्रमोद वामन लोखंडे, कासम फरीद तडवी हे झोपलेले होते. ज्यावेळी वीज पडली त्या वेळेला सर्वजन झोपी गेलेल्या शेडमधील लाईटच्या बोर्डात मोठा आवाज झाला. त्यावेळी सर्वजण जागे झाले. आवाज कशाचा झाला हे लक्षात न आल्याने बाहेर येऊन पाहतात तर गाय ओरडत असल्याचा आवाज आला. गाईला बघितले तेव्हा गाय तळमळत होती. आणि काही मिनिटातच गाय व वगार ठार झाल्याचे वामन लोखंडे यांनी सांगितले. तलाठी रूपाली रायगडे व कोतवाल उमेद चव्हाण यांनी पंचनामा केला असून ४० हजार रुपये किंमतीची गाय आणि दहा हजार रुपये किंमतीची वगार ठार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *