आष्टी(प्रतिनिधी) :रस्तेमहर्षी लोकप्रिय आ.भीमराव धोंडे यांचे हस्ते शुक्रवारी दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा आष्टी खडकत रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन खडकत येथे होणार असल्याचे खडकत गावचे सरपंच रामदास उदमले यांनी सांगितले आहे
आष्टी खडकत या 19 कि.मी.रस्त्याला 2 कोटी 82 लाख रु मंजुर झाले असुन या कामाची निविदा ही मंजुर झाली आहे या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असुन या रस्त्या मुळे आष्टी तालुक्याच्या दळवळणाला मोठ्या प्रमाणावर चालणा मिळणार आहे नगर जिल्ह्यातील कर्जत मिरजगाव श्रीगोंदा या शहरांचा संपर्क होणार आहे आष्टी शहराच्या बाजारपेठेलाही याचा उपयोग होईल या कामाचा भूमिपूजन समारंभ रस्तेमहर्षी आ भीमराव धोंडे साहेब यांचे हस्ते शुक्रवारी दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा खडकत या गावी होत असुन या समारंभाला माजी आ साहेबराव दरेकर जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार सर्व जि.प.सदस्य सर्व प.स.सदस्य तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार असुन मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन सरपंच रामदास उदमले यांनी केले आहे
0