सोयगाव,दि.१३: प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यांच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची माहिती संकलन करण्यासाठी ८७ गावात तलाठी सज्जानिहाय ग्रामसेवक,तलाठी आणि कृषी सहायक यांचे पथके तयार करण्यात आले आहे.या पथकांनी संयुक्तरित्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची आणि शेतीच्या क्षेत्राची माहिती संकलित करून अपलोड करण्याच्या सूचना या पथकांना दिल्या असून यामध्ये शेतकऱ्याच्या जातीनिहाय प्रवर्गाची गणना करून शेतकऱ्याचा स्वयंघोषणा पत्र लिहून घेण्याचे महत्वाचे काम करावयाचे आहे.
सोयगाव तालुक्यात अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक तीन टप्प्यात दोन हजार रु याप्रमाणे अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे.त्यासाठी लागणारा शेतकऱ्यांचा डेटा विहित नमुन्यात भरून मुदतीच्या आत सादर करण्यासाठी १८ तलाठी सज्जाकार्यालय निहाय संयुक्त पथके तयार करण्यात आली आहे.यासाठी कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत दि.१५ पर्यंत सायंकाळी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयात सादर करावयाच्या असून यामध्ये दि.२० पर्यंत प्राप्त याद्यांवर शेतकऱ्यांनी आक्षेप व हरकती नोंदवायच्या आहे.त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील.या कामात नियुक्त कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ अथवा कुचराई झाल्यास त्यांचेवर नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ नियम १९७९ अन्वये कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम आदेशात दिला आहे.
0