सोयगाव,ता.२४:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आठवडाभरापूर्वी वादळी वाऱ्यात पत्रे उडालेल्या कवली ता.सोयगाव ग्रामपंचायतीचा कारभार चक्क उघड्यावर सुरु असतांनाही जिल्हा प्रशासनाने अद्यापही या ग्रामपंचायतीच्या दुरुस्तीला निधी न दिल्याने उघड्यावर या ग्रामपंचायतीचा कारभार सुरु झालेला आहे.
आठवडाभरापूर्वी सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्याच्या तडाखा आणि मुसळधार पावसाने मोठी दाणादाण उडवून दिलेली होती या वादळी वाऱ्यात कवली ता.सोयगाव ग्रामपंचायतीचे चक्क पत्रे उडून ग्रामपंचायत उघडी पडली आहे.मात्र आठवडाभरापासून या ग्रामपंचायतीला अद्यापही दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांना उघड्यावर कारभार करावा लागत आहे.कवली ता.सोयगाव ग्रामपंचायतीला बाय्वाने इमारत मंजूर करून देनुयात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून सध्या कोरोनाच्या काळात मात्र चक्क उघड्यावर या ग्रामपंचायतीचा कारभार सुरु असल्याने ग्रामपंचायतीचे महत्वाचे साहित्य आणि दस्तावेज मात्र धोक्यात आली आहे.
गावाच्या कारभारासाठी नव्याने ग्रामपंचायतीची इमारत उभारण्यात यावी त्या प्रकारचा ठराव पाठविण्यात आलेला असून शासनाकडून मात्र अद्याप कोणताही हिरवा कंदील दाखविण्यात आलेला नाही.ग्रामपंचायतीला नवीन इमारत गरजेची आहे.
―जुबेदाबाई तडवी
सरपंच कवली