अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील गोरगरीबांना कोरोना संकटात तीन महिन्यांचे धान्य हे एकदाच पाठवले आहे.परंतु राज्य सरकारने हे धान्य अद्यापही का वाटप केले नाही ? असा सवाल भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.तसेच उत्तरप्रदेश सरकारने राज्यातील कामगारांसाठी 2250/- रूपये प्रत्येकी आर्थिक मदत केली.त्या स्वरूपात महाराष्ट्र सरकार का ? देत नाही असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे की.कोरोना या संकट काळात राज्यातील गरजू,गरिब,निराधार माणुस उपाशी राहू नये म्हणुन पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी देशातील लोकांना तीन महिन्याच धान्य एकाच वेळी देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे राज्य सरकारला 90% धान्याचा कोटा ही वितरीत केला आहे.मात्र सरकारने या योजनेला हरताळ फासत तीन महिन्याचे धान्य अद्याप लोकांना वाटप केलेले नाही. केंद्राने देवून ही राज्य सरकार जर जनतेच्या घशातला घास राखून ठेवते,म्हणजे हा प्रकार तर लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच आहे. राज्य सरकार गोरगरीबांसाठी एक रूपया ही आर्थिक पॅकेज जाहिर करत नाही ? ज्यांचे हातावर पोट त्यांची उपासमार होत आहे.उत्तरप्रदेश सरकारने त्या राज्यात कामगारांना प्रत्येकी 2250/- रूपये खात्यावर जमा करून टाकले.मात्र आमचं सरकार एक दमडी ही देत नाही.हे दुर्देव आहे.लोकांना या काळात आर्थिक मदतीची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे. सामाजिक संवेदना ठेवून तडफा तडकी निर्णय घेण्याची वर्तमानकाळात गरज आहे.केंद्र सरकारने जाहिर केलेला आर्थिक मदतीचा अकरा हजार कोटीचा हप्ता सरकारला प्राप्त झाला.केंद्र सरकार माणसी पाच किलो तांदूळ पण,देणार आहे.केंद्राच्या योजना प्रभावीपणे राज्य सरकार राबवत नाही हे दुर्देव आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ध्येय धोरणांवर टिका करणारे मंञी जितेन्द्र आव्हाडा सारखे नेते आज राज्य सरकारच्या भुमिकेवर गप्प का ? असा सवाल राम कुलकर्णी यांनी केला.तेव्हा सरकारने अगोदर धान्य कोटा केंद्र सरकारच्या आदेशानुसार तात्काळ वाटप करावा अशी मागणी या पत्रकाद्वारे त्यांनी केली आहे.या प्रश्नावर आमचे नेते मा.देवेन्द्रजी फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांना लेखी पत्र देवून धान्य वाटपाची मागणी केली आहे.रेशनकार्ड नसणाऱ्या लोकांना पण,धान्य देण्याची मागणी केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.