सामाजिक

बचत गटाच्या महिला समाजाच्या रक्तवाहिन्या,महिलांमध्ये आरोग्य विषयक जाणीवजागृती वाढवावी- डॉ.आशा सकोळकर

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात बचत गटातील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा

सोयगाव,ता.१५(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):- महिला बचत गटांनी केवळ आर्थिक सक्षमीकरणावर भर न देता त्यांनी महिलांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या पाहिजे,व त्यावर कार्य केले पाहिजे, तसेच महिलांच्या प्रमुख आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्याविषयी त्यांच्या मध्ये जाणीवजागृती वाढवावी असे प्रतिपादन डॉ.आशा साकोळकर यांनी केले. सोयगावला शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत बचत गटातील महिलांच्या स्वयंम रोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ.पुष्पाताई काळे अध्यक्षस्थानी होत्या तर देविना काळे,श्रीमती मीनाक्षी बिराजदार, प्राचार्य डॉ अशोक नाईकवाडे,उपप्राचार्य डॉ.शिरीष पवार,श्री संजीवन सोनवणे,श्री विलास लाठे,श्री संभाजी नागणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नाईकवाडे यांनी कार्यशाळा आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर देविना काळे यांनी सोयगाव तालुक्यातील बचत गटांकडे उत्पादन क्षमता खूप आहे परंतु त्या उत्पादनाला आवश्यक बाजार उपलब्ध नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आपण उत्पादना बरोबर बाजार उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे असे मत मांडले.
शेवटी आपला अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ पुष्पाताई काळे यांनी बचतगटातील महिला आज विविध उत्पादने निर्माण करून आपले कुटुंबे सक्षम करतांना दिसत आहे. महिला ह्या पुढे आल्या तर पूर्ण कुटुंब सुधारते कुटुंब पुढे आले की समाज प्रगत होतो व समाज पुढे आली की देशाची प्रगती होण्यास सुरुवात होते अशी भूमिका मांडली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार प्रा सैराज तडवी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ प्रशांत देशमुख, डॉ लक्ष्मीनारायण कुरपटवार, डॉ सी यु भोरे, डॉ फुलचंद सलामपुरे, प्रा गौतम निकम, डॉ आर आर खडके, प्रा. संतोष पडघन, डॉ सुनील चौधरे, प्रा गोविंद फड, डॉ मनोजकुमार चोपडे, डॉ शंतनू चव्हाण, प्रा शिवाजी शिरसाठ, प्रा श्रीकृष्ण परिहार, डॉ पंकज शिंदे, डॉ गणेश मिसाळ, प्रा ए ए सय्यद, श्री पंकज साबळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी बचत गटांच्या महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

1 Comment

  • महिला च्या सक्षमीकरणा साठी केलेला नाविण्यपूर्ण कार्यक्रम होय .

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.