बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

सोयगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद ,फुलपात्यांवर आलेल्या पिकांचे नुकसान

सोयगाव,दि.२३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह परिसरात झालेल्या बुधवारच्या पावसाची अतिवृष्टी झाल्याची नोंद महसूल विभागाने केली असून या अतिवृष्टीत सोयगाव शिवारातील फुलपात्यांवर आलेल्या खरिपाच्या हंगामावर पुनः संकट कोसळले आहे.सोयगाव शिवारात काही भागात नाल्यांच्या आलेल्या पुरात शेतीसह खरीपाचे पिके वाहून गेली आहे.त्यामुळे सोयगाव शिवारात फुलपात्यांवर आलेल्या पिकांना पुनः अतिवृष्टीचा धक्का बसला आहे.
गेल्या पाच दिवसापासून सोयगाव तालुक्यात पावसाचा खंड पडलेला असतांना बुधवारी दुपारी अचानक झालेल्या पावसाने सोयगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.यामध्ये शहरातील प्रमुख भागात पुराचे पाणी स्जीराल्याने गोंधळ उडाला होता.या अतिवृष्टीच्या पावसात मात्र सोयगाव शिवारातील ११० एकरवरील खारीपाच्या पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक अहवाल तालुका कृषी विभागाने दिला असून या नुकसानीचे पंचनामे होईल किंवा नाही याबाबत शेतकऱ्यांना प्रश्नचिन्हे निर्माण झाले आहे.अतिवृष्टीचा निकष ६५ मी.मी पेक्षा जास्त पाउस झाल्यास त्या ठिकाणच्या मंडळ स्तरावरील गावांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश काढण्यात येतात,परंतु कोरोना संसर्गाच्या सोयगावसह उर्वरित मंडळात तब्बल जून महिन्यापासून तीनवेळा अतिवृष्टीची नोंद विविध मंडळात नोंदविल्या गेलेली असतांना मात्र पंचनामे झालेले नाही केवळ पंचनामे तर दूरच परंतु अद्यापही या तीन वेळा झालेल्या मंडळातील नुकसानीची पाहणीही करण्यात आलेली नसल्याचे शेतकऱ्यांनी डोळ्यादेखत पहिले आहे.सोयगाव मंडळात या पाब्साल्यात तब्बल तीनवेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती पहिल्यांदा खरीपाची कोवळी अंकुर असतांना अतिवृष्टी झाली होती त्यावेळच्या पावसात सोयगावला सहा जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.त्या जनावरांच्या नुकसानीचीघी अद्याप मदत पशुपालकांच्या पदरात पडलेली नसून बुधवारच्या अतिवृष्टीचा प्रश्न तर दूरच राहिला आहे.घोसला ता.सोयगाव गावातही आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसात नाल्याला आलेल्या पुरात तब्बल ५० शेतकऱ्यांचे उभे पिके वाहून गेलेली आहे.या नुकसानीची पाहणी कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केली असून मात्र या भागातील पंचनामे संथगतीने चालू असल्याचे बाधित शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
—————————-

कोरोना संसार्गात अतिवृष्टीचा निकष बाजूला-

कोरोना संसार्गात मात्र अतिवृष्टीचा निकष डावलल्या जात असून या नुकसानीचा निकष कोरोनाचं नावाखाली बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसाल्याचा प्रकार सोयगाव तालुक्यात चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.घोसला गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निम्या हंगामात दुबार पेरण्या हाती घेतल्या आहे.नुकसानीच्या भरपाईची अपेक्षा मात्र या शेतकऱ्यांनी सोडली असून या पंचनाम्यांना प्रशासनाकडून बगल दिलाय जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *