बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी विनोद पोखरकर यांची निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील तरूण उद्योजक विनोद पोखरकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना विषाणु साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर संकटकाळात विविध माध्यमातून गरजूंना मदत केली.जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली.त्यांच्या या विधायक कार्याची दखल घेऊन बसव ब्रिगेडने अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी विनोद सिद्रामआप्पा पोखरकर यांची निवड केली आहे.पोखरकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

हॉटेल साई सुरभीचे संचालक विनोद पोखरकर यांनी वयाच्या 28 व्या वर्षी नोकरीच्या मागे न लागता आपला एक छानसा उद्योग सुरू केला.उद्योग यशस्वी करणे शक्य आहे,हे स्वप्नवत वाटत असेल ही पण,ही किमया विनोद पोखरकर यांनी करून दाखवली आहे.केवळ 7 वर्षांत उद्योगात जम बसवता येऊ शकते,हे त्यांनी दाखवून दिले आहे.”साई सुरभी” या नांवाचा हॉटेल उद्योग त्यांनी सुरू केला आहे.या सोबतच अत्यंत दर्जेदार,चविष्ट आस्वाद देणारे हॉटेल साई सुरभी हा “चाट व फास्टफुड विक्रीचा” नवा उद्योग त्यांनी अंबाजोगाई शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करून केवळ 5 वर्षांत त्यात आपला दबदबा निर्माण केला आहे.विनोद पोखरकर हे मुळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील.आई गृहिणी आणि वडील सिद्रामआप्पा पोखरकर हे अंबाजोगाई नगरपरिषदेतून काही वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत.विनोद यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे झाले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना स्वतःचा उद्योग थाटावा असे वाटले. शोध सुरू केला.यानुसार त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला.घराची जबाबदारी सांभाळत आर्थिक हातभार लावला.यासाठी भाऊ प्रमोद यांचे सहकार्याने कुटुंबाची आर्थिक बाजू पक्की केली.आपल्या व्यवसायात विनोद पोखरकर यांनी सध्या 30 जणांना रोजगार दिला.सुरूवातीला मिळालेला पैसा व्यवसायात गुंतवला.आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री, मनुष्यबळाचे कौशल्य,शिक्षण यावर त्यांचा आजही भर आहे.व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे त्यांचा विधायक उद्देश आहे.घरात कुठेही उद्योजकतेची पाळेमुळे रूजलेली नसताना केवळ काही तरी वेगळे करायचे आणि त्यात आपला दबदबा निर्माण करायचा या हेतूने झपाटलेल्या विनोद यांनी आधी पञकारीतेचे शिक्षण ही घेतले आहे.नोकरीतील तोच तो पणा नको म्हणून वयाच्या 34 व्या वर्षी ‘कॅलक्युलेटिव्ह रिस्क’ घेत ते उद्योजक म्हणून यशस्वी ठरले आहेत.व्यवसाय उभारताना प्रत्येक बाबतीत व्यावसायिक आणि अनुभव असलेल्यांशी झालेले शेअरिंग,मार्गदर्शन मोलाचे सहकार्य देऊन गेले.ते म्हणाले,पत्नीने दिलेली साथ कायम लक्षात राहणारी आहे.आधी नोकरी करावी,अनुभव घ्यावा आणि मगच व्यवसायात यावे कारण,त्याशिवाय अनुभवसिद्धता येत नाही.स्वतः नियोजन,ऑर्डर मिळवण्याचे काम करतो.क्वालिटी,क्वांटिटी आणि पंक्चुअॅलिटी हे यशाचे गमक आहे.उद्योग सुरू करणे ही कसरत असून मिळणारा उद्योजकीय निर्मितीचा आनंद-समाधान वेगळेच आहे.जे कुठल्याही नोकरीत मिळू शकत नाही.नैराश्यावर कायम मात करत आलो.ती मात करताना मित्रमंडळीचा सहभाग मोठा होता.आज व्यवसाय वाढला.व्याप वाढला.त्यामुळे विनोद यांच्या व्यवसायाची भरभराट झाली. व्यवसाय वाढला.एकापासून आज अंबाजोगाईत चार शाखा आहेत.यातून मग सामाजिक प्रगती साधली गेली.आज ते दिवसाला 10 ते 16 तास अविश्रांत काम करतात.आज हे सुखाचे दिवस अनुभवताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.पण,त्यांना न घाबरता त्यांनी सकारात्मक निर्णय घेतले.आलेल्या संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवणे आवश्यक असते.ही संकटे आपल्याला भरपूर शिकवून जातात असे ते आवर्जून नोंदवतात.कुशल मनुष्यबळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे.शिवसेनेचे नेते माजी मंञी जयदत्तआण्णा क्षीरसागर समर्थक म्हणून विनोद पोखरकर हे सर्वञ ओळखले जातात.लॉकडाऊन काळामध्ये अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.गरजूंना मोफत जेवण,अन्नधान्याचे कीट,मास्क,सॅनिटायझर वाटप,सॅनिटायझर फवारणी ही केली.तसेच लॉकडाऊन काळात हिंगोली जिल्ह्यातील मजुर हे अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या सिमेवर जंगलात अडकून पडले होते.त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले.फेसबुकद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून सुरक्षित कसे राहता येईल हे सांगितले.आज सर्वांनी मिळून कोरोनाला हरवण्यासाठी एकत्र यायला हवे.अंबाजोगाई नगरपरिषद परिसरामध्ये दररोज शेकडो लोक ये-जा करतात.तसेच कर्मचारी यांच्यासाठी 2 सॅनिटायझर मशीन सुरू करून यामुळे रोज शेकडो लोकांचा फायदा होवून ते सुरक्षित राहतील हा विचार पोखरकर यांनी हॉटेल साई सुरभीच्या माध्यमातून पुढे आणला आहे.हे करत असतानाच विनोद यांनी मागील काही वर्षांपासून महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून लिंगायत समाजातील तरूणांचे संघटन करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबिवले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड.अविनाश भोसीकर यांनी नियुक्तीपञ देवून विनोद यांची बसव ब्रिगेडच्या अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या मराठवाडा विभाग अध्यक्षपदी निवड केली आहे.निवडीबद्दल त्यांचे औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक प्रदीप बुरांडे यांनी अभिनंदन केले आहे.तर बसव ब्रिगेडचे राज्य सल्लागार अॅड.सुरजकुमार पिल्ले,बीड जिल्हाध्यक्ष बलभीम धारेकर,लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटने,लातूर महानगर अध्यक्ष रवि बिराजदार,नांदेड जिल्हाध्यक्ष डाॅ.व्यंकट कु-हाडे,तेलंगणा राज्यप्रभारी शरण शिवराज पाटील गाडीवान,
यवतमाळ जिल्हाध्यक्ष निलेश शेटे,नांदेड व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर कु-हाडे,मनोजकुमार बरदाळे,प्रसाद कोठाळे,सुरज आकुसकर,गजानन देशपांडे यांची उपस्थिती होती.पोखरकर यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

बसव ब्रिगेडच्या माध्यमातून मराठवाड्यात ताकद निर्माण करणार

=================
बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंचच्या माध्यमातून मराठवाड्यात विधायक कार्यासाठी युवकांची ताकद निर्माण करणार आहे.लिंगायत समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अशी भूमिका घेवून,सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे.जिद्द,मेहनत व चिकाटीच्या जोरावर यशस्वी होता येते.सतत काहीतरी नवे करण्याचा ध्यास असावा.मेहनतीची तयारी ठेवावी.कितीही संकटे आली तरी हार मानू नये.मग यश येतेच असा ठाम विश्वास बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंचचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *