बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार – काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील

अंबाजोगाई (वार्ताहर):
मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे बुधवार,दिनांक २ जून रोजी अंबाजोगाईत आले होते.यावेळी पञकार परीषदेत बोलताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजप आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे सरकारच जबाबदार आहे असे काँग्रेस प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील म्हणाले.पञकार परिषदेनंतर डॉ.संजय लाखे पाटील यांनी मराठा समाज बांधव व विविध संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी आयोजित बैठकीतून संवाद साधला.तर यावेळेस बोलताना मराठा आरक्षणाबाबत तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण,वंचित बहुजन समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण याबाबत भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले.

लाखे पाटील हे आपल्या दौ-याची सुरूवात मराठवाड्यापासून करीत आहेत.ते या विषयांवर संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.यानिमित्ताने ते अंबाजोगाईत बुधवार,दिनांक २ जून रोजी नगरपरिषदेच्या मिटींग हॉल येथे काँग्रेस पक्ष प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील यांच्या पञकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष महादेव आदमाने,बालाजी शेळके,शरद देशमुख आदींची उपस्थिती होती.आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना
डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून विविध दाखले देत मराठा आरक्षण बाबत महाविकास आघाडी सरकार व काँग्रेस पक्षाने केलेले प्रामाणिक प्रयत्न याची तपशीलवार व मुद्देसूद माहिती दिली.भाजपाच्या आरक्षण विरोधी कुटील डावाची पोलखोल केली,लाखे पाटील म्हणाले की,मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चुकीची माहिती देऊन मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे.भाजपाचा हा खोटारडेपणा आता उघड झाला आहे.मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास केंद्रातील भाजपचे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे.ही वस्तुस्थिती समाजाला माहित करून देण्यासाठी मी राज्यभरात दौरा करीत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील मोदी सरकारने १०२ वी बोगस घटनादुरूस्ती अत्यंत घाईत मंजूर केली आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना एसईबीसी प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार नसताना देखिल १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर तब्बल १०६ दिवसांनी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणाचा कायद्याचा शासन आदेश काढून मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे.ही वस्तुस्थिती स्पष्ट असताना आता विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस,प्रवीण
दरेकर,आशिष शेलार,चंद्रकांत पाटील हे पुन्हा एकदा मराठा समाजाची दिशाभूल करून कोविड असतानाही मोर्चे काढण्यास समाजाला प्रवृत्त करीत आहेत.छञपती शिवरायांच्या नावाने मते मिळवून केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला आता छञपतींचा विसर पडला आहे.महाराष्ट्रासाठी आदरस्थानी असणारे खासदार छञपती संभाजी महाराज यांना मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी व हा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदी भेटत नाहीत,वेळ देत नाहीत.हा महाराष्ट्राचा घोर अवमान आहे.भाजपाच्या दिशाभूल व अपप्रचाराला मराठा तरूणांनी व समाजाने समजून घ्यावे असे डॉ.लाखे पाटील म्हणाले.प्रारंभी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार एसईबीसी आरक्षणाचे अभ्यासक,राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करीत आहेत.या दौऱ्याची सुरूवात आज बुधवार,दिनांक २ जूनपासून होत असून २ जून ते ५ पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करीत आहेत.पञकार परीषद आणि बैठकीतून ते मराठा समाज बांधव,काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी,मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून बैठकीतून संवाद साधत आहेत,मराठा आरक्षणाबाबत सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू मांडण्यासाठी ते महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.सर्वोच्च न्यायालयामधील मराठा आरक्षण प्रकरणामध्ये निकाल मराठा समाजाच्या विरोधात जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे असा धांदांत खोटा प्रचार व दिशाभूल राज्यभरात भाजपा नेते करीत असून,विषेशतः मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका,पत्रकार परिषद आणि मराठा समाजातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन कोविडच्या संकटकाळात मराठा समाजाला रस्त्यावर येण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत हे दुर्दैवी आहे.लवकरच राज्यभरात असे मेळावे भाजपाच्या व्यवस्थापन आणि आर्थिक तंत्राच्या मदतीने घेतले जाणार आहेत.मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका आयोजीत करून आम्ही संवाद साधत आहोत.

*फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची डॉ.संजय लाखे पाटलांकडून पोलखोल उघड :-*

लाखे पाटील या दौऱ्यात मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच,काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी,मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची पोलखोल संजय लाखे पाटील यांनी अंबाजोगाईत आयोजित पञपरीषदेतून केली.आमदार मेटे यांनी मराठा समाजाची दिशाभूल थांबवावी असे लाखे पाटील यांनी आवाहन केले.ते पुढे म्हणाले की,”ईडब्लूएस” आरक्षणाचा मराठा विद्यार्थी,युवकांना शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीमध्ये लाभ न मिळण्या मागचे खरे सूत्रधार हे आ.मेटेच असल्याचा आरोप करून लाखे पाटील म्हणाले की,राज्य सरकारने या बाबत जो शासन आदेश काढला तो सुस्पष्ट असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो काढावा लागला आहे.मेटे कसलीही याचिका न करता एकीकडे त्याचेही श्रेय लाटत असून दुसरीकडे शासन आदेश सुस्पष्ट नसल्याचे सांगत आहेत.ते राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करीत आहेत.या प्रश्नी ते सरकार आणि अशोकराव चव्हाण यांची विनाकारण बदनामी करीत आहेत.ती मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे असे काँग्रेस पक्ष प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील यांनी अंबाजोगाईत आयोजित पञकार परीषदेत सांगितले.

*मराठा आरक्षणा बाबतची सत्यता उलगडणा-या बैठकीस प्रतिसाद :-*

बीड जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत अंबाजोगाई (जि.बीड) येथील लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृहात बुधवार,दिनांक २ जून रोजी शासनाने निर्गमीत केलेल्या कोविड १९ या साथ रोगा संबधातील सर्व नियम पाळून बैठक झाली.प्रारंभी राजमाता जिजाऊ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.जिजाऊ वंदनेने बैठकीस प्रारंभ झाला.पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून डॉ.संजय लाखे पाटील यांनी मराठा समाज बांधव,काँग्रेसचे नेते,लोकप्रतिनिधी,मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मराठा समाजातील सामाजिक विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून “मराठा आरक्षण व काँग्रेस पक्षाची भूमिका” या विषयांवर बैठकीतून संवाद साधला.या बैठकीस बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी,सर्व सेलचे अध्यक्ष आणि मराठा समाजातील विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी मराठा आरक्षण बाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होते,त्याला अंबाजोगाईत चांगला प्रतिसाद मिळाला.अंबाजोगाई येथे बैठकीस काँग्रेस पक्ष प्रवक्ते डॉ.संजय लाखे पाटील,जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापूस पणन व उत्पादक महासंघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके,उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक अमोल लोमटे,सुनिल व्यवहारे,धम्मपाल सरवदे,माणिक वडवणकर,राणा चव्हाण,रणजित पवार,सुनील वाघाळकर,कचरूलाल सारडा आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीचे सुञसंचालन आनंद टाकळकर यांनी केले.तर प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार ॲड.विष्णुपंत सोळंके यांनी मानले.डॉ.संजय लाखे पाटील यांचा मराठवाडा दौरा सुरू असून शुक्रवार,दिनांक ४ जून २०२१ रोजी बीड येथे सकाळी ११ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी मार्फत बीड येथे आगमन होईल आणि बीड जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक व त्यानंतर पञकार परीषद होणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींकडून देण्यात आली आहे.