Offer

नगरसेवक श्रीहरी गीते यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग १७ चा कायापालट! ; पाटोदा नगरपंचायत 

पाटोदा, १२ जुलै (गणेश शेवाळे): “नेता तोच जो गरजवंतांच्या घरी पहाटे पोहोचतो, आणि काम तेच जो जनतेच्या आशीर्वादाने बोलतो!” हे वाक्य आज पाटोदा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये अक्षरशः सत्य ठरत आहे. कारण या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक श्रीहरी गीते यांनी आपल्या अथक मेहनतीने संपूर्ण परिसराचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात अभूतपूर्व विकासकामे झाली असून, जनतेच्या हाकेला धावणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

जनतेच्या सुख-दुःखातील आधारवड

श्रीहरी गीते यांनी कधीही जात, धर्म, पक्ष, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न ठेवता, प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात आपल्या कुटुंबाच्या आधी धावून मदत केली आहे. ते केवळ एक नगरसेवक नाहीत, तर प्रत्येक प्रभागवासीसाठी एक आश्वासक आधारवड ठरले आहेत. ज्यांना वर्षानुवर्षे घरकुलाचे स्वप्न होते, अशा अनेक गरजू कुटुंबांना श्रीहरी गीते यांच्या प्रयत्नातून आज स्वतःचे हक्काचे घर मिळाले आहे. “बापू येतात आणि काम होते!” हा विश्वास आज प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेला आहे.

रस्त्यांचे जाळे आणि प्रभागाची नवसंजीवनी

काही वर्षांपूर्वी प्रभाग सतरामध्ये चिखलात अडकलेले आणि पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे रस्ते ही नित्याची समस्या होती. मात्र, आज तिथे मजबूत काँक्रीटचे रस्ते उभे आहेत. ज्या ठिकाणी चालणे अवघड होते, तिथे आता स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित रस्ते आहेत. हा श्रीहरी गीते यांच्या कामाचा ठसा आहे. रस्ते विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रभागाला नवसंजीवनी दिली आहे, ज्यामुळे रहिवाशांचे जीवनमान सुधारले आहे.

सदैव जनतेत, सेवाभावी वृत्ती

कोणतेही कार्य असो, आजारी व्यक्तीला मदत करायची असो किंवा कोणाची अडचण असो, ‘बापू’ हे नाव ऐकताच मदतीचा हात पुढे येतो. त्यांची सेवाभावी वृत्ती आणि जनतेशी असलेली थेट बांधिलकी यामुळे ते प्रभागवासीयांचे लाडके नेते बनले आहेत. त्यांच्या कार्यामुळे प्रभाग सतराचे नागरिक आज अभिमानाने म्हणतात, “श्रीहरी गीते आहेत म्हणून आम्हाला भीती नाही!” विकासाचा चेहरा बदलणारे आणि विश्वासाचे प्रतीक बनलेले नगरसेवक श्रीहरी गीते यांनी प्रभाग सतराच्या विकासात मैलाचा दगड रोवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button