पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवाभरतीचा हातभार – संसार उपयोगी साहित्याचे वाटप

पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा परिसरात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या घरातील साहित्य वाहून गेले, जगण्याची साधनं नष्ट झाली. अशा कठीण प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाटोदा व सेवाभरती संघटनांनी पुढाकार घेत पूरग्रस्त कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून त्यांना दिलासा दिला.या मदत कार्यांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांनी भांडीकुंडी यासह दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले साहित्य देण्यात आले. स्वयंसेवकांनी घराघरात पोहोचून हे साहित्य वाटप केले. पूरामुळे हवालदिल झालेल्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर या मदतकार्यामुळे समाधान व दिलासा दिसून आला. संकटसमयी समाजासाठी योगदान देणे हीच खरी सेवा या भावनेतून संघ व सेवाभरती कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी झाले. गावकऱ्यांनी त्यांच्या या पुढाकाराचे मनापासून स्वागत करत कौतुक व्यक्त केले.“समाजासाठी अखंड सेवा हाच आमचा संकल्प आहे. पूरग्रस्तांसोबत सदैव उभे राहून त्यांना आवश्यक मदत पुरवली जाईल,” असे संघ व सेवाभरतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.