Ticker Icon Start
पोलीस भरती

माणुसकीची भिंत च्या माध्यमातून टू व्हीलर चे मोफत वाटप

पाटोदा:नानासाहेब डिडुळ―
पाटोदा येथील माणुसकीची भिंत याच्या माध्यमातून आजपर्यंत ५५ सायकलचे गरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे .माणुसकीची भिंतीचे संयोजक दत्ता देशमाने यांनी ठरवल्याप्रमाणे जोपर्यंत एखादी टू व्हीलर गरजू गरिबांना मोफत देणार नाही येणार नाही तोपर्यंत स्वतः टुविलर घेणार नाही, आज त्यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. टू व्हीलर माणुसकीची भिंतीच्या माध्यमातून सेकंड आणून तिचा रिपेरिंग चा खर्च किरण आवढाळ यांनी केला असून गरजू गरीब लोकांच्या १०जणांची चिठ्ठ्या टाकून एक भाग्यवान विजेता निवडण्यात आला, रागिनी देशमाने ४ वर्षाच्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली व ती चिठ्ठी मदारी सलीम (गारुडी सापवाले जादूगार करंजवण) यांची निघाल्यामुळे त्यांना लुना गाडी मोफत देण्यात आली आहे. मदारी सलीम हे करंजवन ते जवळाला फाटा ५ किलोमीटर पायी जात असल्याने व खऱ्या गरजूंला लूना गाडी मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. गाडी मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, त्यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. या वेळी मदारी सलीम यांनी माणुसकीची भिंत चे आभार मानले . यावेळी उपस्थित माणुसकीची भिंतीचे संयोजक दत्ता देशमाने ,अध्यक्ष रामदास भाकरे, सदस्य किरण आवढाळ, मेडिकल असोसिएशन तालुका अध्यक्ष अरुण पवार, दत्ता नाईक नवरे ,किशोर राऊत ,कल्याण खंडागळे ,हरिभाऊ मस्के इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *

Back to top button