औरंगाबाद: जिल्हा कृषीविभागाची सोयगाव तालुक्यात पाहणी ,पंचनामे करणार

सोयगाव दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीच्या पावसाने खरिपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रासह उन्हाळी लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांची माती करून पुराच्या पाण्यात शेती वाहून गेल्याने खरिपाच्या हंगामाच्या प्रारंभीच झालेल्या नुकसानीची प्राथमिक पाहणी बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे,जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी डॉ.आनंद गंजेवार यांच्या पथकांनी सोयगाव तालुक्यात करून शेतकऱ्यांना धीर दिला आहे.बुधवारी सोयगाव तालुक्यातील तिडका.वाकडी,अन्जोळा आदी शिवारात या पथकांनी पाहणी करून पंचनाम्यांचे आदेश महसूल विभागाने काढले असून याबाबत तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे डॉ.तुकाराम मोटे यांनी सांगितले.
पन्नास वर्षात झाला नाही इतका पावूस सोयगाव तालुक्यातील काही भागात शुक्रवारी मध्यरात्री झाला होता.या पावसाने शेत जमिनी खरडून वाहून,शेतातील हंगामी पूर्व लागवडीतील कोवळे अंकुर आणि काही भागातील शेती पिके वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ,तुकाराम मोटे यांनी तातडीने दखल घेवून बुधवारी सोयगाव तालुक्यातील काही भागात पाहणी दौरा केला,यावेळी पाहणी दौऱ्यात सोयगाव तालुक्यात नुकसान आहे परंतु नुकसानीची दाहकता निकषापेक्षा कमी आहे,परंतु तरीही शेतकऱ्यांना धीर मिळावा यासाठी कृषी विभागाने पंचनाम्यांचा निर्णय घेतला असून बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना महसूल विभागाकडून पाठविण्यात येतील यावर शासन पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.यावेळी अन्जोळा शिवारातील शेतकरी यांच्या शेतात लागवड करण्यात आलेल्या अद्रक पिकांचे बियाणे झालेल्या पावसाच्या पुरात तब्बल आठशे मीटर अंतरावर वाहून आल्याने अद्रकची शेती आर्वीच्या शेतात असा प्रकार घडला होता,या प्रकारची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे,जिल्हा कृषी अधिकारी डॉ.आनंद गंजेवार यांनी पाहून त्यांना धीर दिला आहे.यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,सुशील पाटील,ईश्वर सपकाळ,आप्पा वाघ,कृषी सहायक हेमंत देशमुख,अतुल पाटील,पंकज महालपुरे आदींची उपस्थिती होती.

दौरा खरीप पिक पाहणीचा-

सोयगाव तालुक्यातील हा दौरा खरीप हंगाम पेरण्यांच्या पीकपाहणीचा असून नुकसान पाहणीचा नसल्याचे जिल्हा कृषी पथकांनी सांगून अचानक कोलांटउडी घेतली होती त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाच्या प्रत्यक्ष नुकसानीचा मावेजा महसूलच्या पंचनाम्यांवर आधारित असेल असा सूचक टोलाही या पथकांनी लगावला त्यामुळे मदतीची आशा धूसर झालेली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.