पंकजा मुंडे उद्या करणार ८६ कोटीच्या धर्मापूरी-पानगांव राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन

५ कोटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचेही होणार लोकार्पण

परळी:आठवडा विशेष टीम― राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या शनिवारी (ता. ०३ ) तालुक्यातील धर्मापूरी येथे धर्मापूरी-पानगांव या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे, २५ किमी लांबीच्या या महामार्गासाठी ८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाबरोबरच ५ कोटी रुपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ही त्यांच्या हस्ते होणार आहे.

उद्या दुपारी ४.३० वा. धर्मापूरी येथील जिजामाता विद्यालय पानगांव चौक परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन व राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत ५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते यावेळी होणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

विकासाची शब्दपूर्ती

ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळी मतदारसंघात १५४ किमी लांबीचे तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून त्यासाठी ९१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यांच्यामुळे परळी हे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावांत विकासाची कोट्यवधी रुपयांची कामे सध्या सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा शब्द त्या पुर्ण करत आहेत, याबद्दल मतदारसंघातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.