COVID-19: कोरोना व्हायरसवर औषध ,न्यूयॉर्कच्या Pfizer कंपनीने केला दावा; अँटिव्हायरल कंपाउंड सापडल्याचा दावा

न्यूयॉर्क:आठवडा विशेष टीम― नॉवेल कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे.त्यावर उपचार शोधण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत.कोरोना व्हायरसला मारक अशा औषधांचा शोध सुरू युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात शास्त्रज्ञांना एक असा कंपाउंड(घटक) सापडला ज्याने करोना व्हायरस आजाराचा उपचार होऊ शकतो असा दावा एका फार्माकंपनीने केला आहे.

आम्ही असा अँटिव्हायरल कंपाउंड तयार केला आहे, ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा उपचार शक्य आहे, असा दावा अमेरिकेतील फाइजर Pfizer Inc (PFE.N) या न्यूयॉर्क औषध कंपनी केला आहे.

पीफायजर कंपनीने सांगितलं की या कंपाऊंडमध्ये कोरोनाव्हायरसला रोखण्याची क्षमता आहे. या घटकाची सध्या स्क्रिनिंग सुरू आहे, जी मार्च अखेर पूर्ण होईल. जर ही स्क्रिनिंग सुरू झाली तर यावर प्रयोग सुरू होईल आणि औषधाची चाचणी होईल.