पशुसंवर्धन पदविका धारकांना शासनाने नोंदणीकृत करून स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवसायास परवानगी द्यावी !

बीड दि.०४ ऑगस्ट २०२१:आठवडा विशेष टीम― राज्यातील दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत करून त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून वाड्या-वस्त्यांवर पशुसेवा अगदी कमी वेळात पोहचेल व गाई-म्हशीचे प्राण वाचेल.शासन दुधाचा महापूर आणण्यासाठी प्रयत्न करते योजना आखते परंतु त्यात मोलाचा वाटा असणारे पशुसंवर्धन पदविकाधारकांच्या नोंदणीच्या वेळी मात्र काणाडोळा करते.असे न करता शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून प्रथमतः पशुसंवर्धन पदविका धारकांना कायदेशीर पशुवैद्यक म्हणून घोषित करावे व त्यांची नोंदणी करून त्यांना नोंदणीक्रमांक द्यावा अशी मागणी जोर धरून आहे. १९८४ च्या कायद्यात बदल करावा, पशुसंवर्धन पदवीकाधारकांना व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे मात्र शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून कृषीप्रधान देशातच पशूंकडे शासनाचे लक्ष नसल्याचे समोर येत आहे.

पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ कलमाअंतर्गत व्यावसायिक नोंदणी देवून संरक्षण द्यावे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीमधून पशुसंवर्धन पदवीधारकांच्या राज्यव्यापी परिषदेची नियुक्ती करून स्वतंत्ररीत्या औषधे बाळगणे व नोंदणीकृत व्यवसाय परवाना उपलब्ध करून द्यावा.राज्यातील रिक्त पशुधन पर्यवेक्षक पदांची तत्काळ भरती करण्यात यावी.खासगीरीत्या असंघटित क्षेत्रात भारतीय पशुचिकित्सक परिषद कायद्यान्वये किरकोळ व प्राथमिक स्वरूपाच्या पशुवैद्यकीय उपचार सेवा पदवीधारक डॉक्‍टरच्या सुपरव्हिजन व माध्यमांचा वापर करून आपले कार्य पार पाडतात अशा सर्व पशुसंवर्धन पदविका धारकांना महाराष्ट्र शासनाने नोंदणीप्रमाणपत्र व ओळखपत्र देऊन पशुसेवेचे कार्य सुरू ठेवण्यासाठी बळ द्यावे.

धुळे जिल्ह्यात ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश– जिल्हादंडाधिकारी संजय यादव

धुळे, दि.२८:आठवडा विशेष टीम― आगामी सण, उत्सव तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 28 मे ते 11 जून 2020 या कालावधीत मुंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी लागू केले आहेत.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी, पोलिस अधीक्षक, धुळे यांनी सादर केलेला अहवाल पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी त्यांना मुंबई पोलिस अधिनियमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील कोणत्याही इसमास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील, अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरणे, दगड अगर अस्त्रे सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे आणि बरोबर नेणे, सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
सभा घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीशिवाय काढण्यात आलेले मोर्चे, रॅली, सभा. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) हा आदेश ज्यांना लाठी अगर तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही, अशा अपंग व्यक्तींना लागू नाही. तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाहीत.
तसेच मुंबई पोलिस अधिनियमानुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगी शिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा, मीटिंग, कार्यक्रम, रॅली इत्यादीबाबत स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यावी. अशी परवानगी तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडेबाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास हे निर्बंध लागू होणार नाहीत, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे. हा आदेश 28 मे 2020 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 11 जून 2020 रोजीच्या 23.55 वाजेपर्यंत लागू होईल.


धुळे: स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

धुळे, दि. 28:आठवडा विशेष टीम― स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुधाकर शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


धुळे: जिल्हा कारागृहात फवारणी

धुळे:आठवडा विशेष टीम― जिल्हा कारागृहात असलेल्या बंदिवानाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली होती त्या बंदिवानाच्या संपर्कातील १४ जणांची तपासणी केली असता ते निगेटिव्ह निघाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत असतांना मृत्यू झाला. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा आरोग्य विभागाने शनिवारी जिल्हा कारागृहातील कर्मचाऱ्यांची वसाहतही कंन्टेन्मेट झोन म्हणून सील केली.


धुळे: शहाद्यात भाजीपाला आडत व्यावसायिकांकडून बेमुदत बंदचा इशारा

शहादा:आठवडा विशेष टीम―भाजीपाल्याच्या आडत दुकानांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी म्हणून २००५ पासून केलेली मागणी दुर्लक्षित झाल्याने भाजीपाला दुकानदार संघटनेच्यावतीने वेमुदत वंदची घोषणा करण्यात आल्याचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्त केले. पालिका, कृपी उत्पन्न वाजार समिती, आणि नेते यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न रेंगाळत असल्याचा आरोप देखील संघटनेच्यावतीने करण्यात आला.यामुळे येत्या काही दिवसात शहादे करांना भाजीपाला मुकावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे गेल्या दोन दिवसानंतर शहरात चांगला भाजीपाला मिळत नसल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे तातडीने या प्रश्नाकडे प्रशासन आणि पदाधिका-यांनी लक्ष देऊन सोडवणूक करण्याची गरज निर्माण झाली आहे.याबाबत सविस्तर असे की शहादा शहरातील मध्यवर्ती भाजी मंडई आणि त्याला लागून असलेली आडत दुकाने कोरोना कंटेनमेंट झोन मध्ये आल्याने सध्या त्या ठिकाणी भाजीपाल्याचा लिलाव प्रशासनाने थांबवलेला आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून शहादा शहराच्या वळण रस्त्यावर काही जणांनी दुकाने घेऊन व्यवस्था केली आहे. मात्र इतरांना अजूनही जागा उपलब्ध न झाल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आणि किरकोळ विक्रेत्यांना देखील येणे जाणे जिकरीचे झाले आहे. ही व्यवस्था कोलमडलेली आहे.तुर्तास कृपी उत्पन्न वाजार समितीच्या आवारामध्ये यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी पुढे करण्यात आली आहे.२००५ साली सहकारमहर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या उपस्थितीत भाजीपाला आडत दुकान साठी भूमिपूजन आणि कोनशिला देखील लावण्यात आली होती. मात्र त्यावेळी आर्थिक तडजोड न झाल्याने हा प्रस्ताव वारगळला. दरम्यान आताची परिस्थिती ओढवल्याने संघटनेने याच मागणीचा पाठपुरावा केला आहे सोवतच पालिकेला देखील यासंदर्भात व्यवस्था करण्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे.जिल्ह्यात आणि राज्यात सर्वदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच भाजीपाला आणि मंडळी व्यवस्था होत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले मात्र शहादा कृपी उत्पन्न वाजार समितीत केवळ आणि केवळ भुसार मान विक्रेत्यांना सुविधा उपलब्ध असल्याचे खंडू वच्छाव यांनी स्पष्ट केले तर या ठिकाणीच लाकूड व्यापाऱ्यांना जागा देत भाजीपाला व्यवसायिकांना आणि व्यवसायिकांना दूर ठेवले जात असल्याचाही आरोप संघटनेचे विनायक पवार यांनी केला आहे दुकानदार संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष हाजी युसुफ दिलावर मंसुरी,कैलास किसन चौधरी, सतिप पंडितराव महाजन, भरत मधुकर दुरंगी, दीपक दामोदर पाटील, वसंतराव भीमराव पाटील, राज मधुकर दुरंगी,हाजी हारून शेख अहमद वागवान, भिका नत्थू चौधरी,प्रकाश प्रभाकर चौधरी, विनायक निंवा पवार ,जालंदर धर्मा पाटील यांनी विविध पैलूंवर पत्रपरिपदेत माहिती दिली.दरम्यान पालिका प्रशासन आणि नेतृत्व ,तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नेतृत्व यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे या प्रकरणात दाद मागणार असल्याचे अध्यक्ष दशरथ चौधरी यांनी संघटनेच्या वतीने स्पष्ट केले.

धुळे: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बांधावर होणार खतांचे वाटप

धुळे:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील निमखेडी येथील महिला बचत गटातील महिला व शेतकरी गटाच्या सदस्यांना वांधावर खतांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय झाला.आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात झाली. या वेळी उपविभागीय कृपी अधिकारी भालचंद्र वैसाणे, जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, मंडळ कृपी अधिकारी महेंद्र वारुळे, उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी सरपंच सतीश पाटील, कृपी सहायक मधुकर सोनवणे, निरंजन साझुंखे, वापू सोनवणे, कुंडाणेचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिसोदे, वरखडीचे माजी सरपंच ज्ञानेश्व मराठे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. महिला वचत गटाच्या अनिता पाटील यांच्यासह अन्य एका शेतक-याला प्रातिनिधिक स्वरूपात खत देण्यात आली. आमदार कुणाल पाटील म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांना बांधावर बि-बियाणे, खते देण्याचा निर्णय झाला आहे. शेतकन्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा असेही ते म्हणाले. गणेश अॅग्रोचे संचालक साझुंखे यांनी निमखेडी येथे खताच्या गोण्या महिला वचतगट व शेतकरी गटाला दिल्याचे सांगितले.

धुळे: निकुंभे येथे हिंस्र बिबट्याने वासराचा पाडला फडशा ;बुरझड परिसरात दहशत, वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी

धुळे:आठवडा विशेष टीम―धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात चिंचवारकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यालगत डोंगर भागात काल (दि.१७) च्या भल्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास हिंसा बिबट्याने गायीच्या वासराचा फडशा पाडला. या घटनेनंतर बिबट्याची परिसरात दहशत निर्माण होऊन शेतकऱ्यांसह ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. तोंडाला रक्त लागलेल्या बिबट्याने परिसरात धुमाकूळ घालण्याअगोदर संबंधित वन विभागाने त्वरेने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा; अशी एकमुखी मागणी केली जात आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, निकुंभे शिवारातील गट नं.१३१/१ मधील शेतकरी चैत्राम पाटील यांच्या मालकीच्या शेतात दुधाळ गाय व तिचे वासरु नेहमीप्रमाणे बांधले होते. काल दि. १७ मे रविवार, रोजी भल्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास हिंस्त्र बिबट्याने शेतात प्रवेश करुन गायीच्या वासरावर हल्ला चढविला. हल्ल्यात चवताळलेल्या बिबट्याने वासराच्या मानेचे लचके तोडत फडशाच पाडला. शेतमालक चैत्राम पाटील यांचा मुलगा प्रशांत पहाटे साडेपाच वाजता गायीचे दूध काढण्यासाठी आला तेव्हा हल्ल्याची ही घटना व मरुन पडलेले गायीचे वासरु त्याच्या निदर्शनात आले. याबाबत प्रशांत पाटील यांनी सांगितले की, बिबट्यांनी आतापर्यंत अनेक वेळा परिसरातील बुरझड, बोरीस, मेरगाव आदी भागात असे हल्ले केलेले आहेत. त्यामध्ये कितीतरी निरपराध पशू ठार झाले आहेत. या संदर्भात संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून लेखी निवेदने ही दिली आहेत. परंतु बिबट्या अद्याप वन विभागाच्या हाती लागलेला नाही. चाणाक्ष बिबट्या चकमा देत, वारंवार जागा बदल करत, छुप्या पध्दतीने परिसरात वेगवेगळ्या भागात हल्ले करुन दहशत पसरवित आहे. संबंधित बोरीस ग्राम पंचायतीने सुध्दा याबाबत वन विभागास लेखी निवेदन दिले आहे. हिंस्त्र बिबट्यापासून परिसरात पशृंबरोबरच मानवी जीविताला मोठा धोका निर्माण बिबट्याने वासराचा फडशाबाबत वन अधिकारी यांना कळविण्यात आले असून, मृत वासराचा पंचनामा आदी प्रशासकीय कामकाज उशिरापर्यंत सुरुच होते. वन विभागाने एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

धुळे: लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडावे; मलांजन ग्रामस्थांचे निवेदन

पिंपळनेर (धुळे):आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्वच बंद असल्याकारणाने शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल त्याला कावडीमोल दराने विकावा लागत आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिनाम्हणून शेतात असलेले पीक जगवणे शेतकऱ्याला जिकिरीचे झाले आहे. वास्तविक, गेल्या वर्षी अतिवृष्टीसह भरपूर पाऊस पडूनही सद्यःस्थितीला पाण्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारण भूगर्भात मूळ बेसाल्ट खडकावर संपूर्ण गावाचे शिवार आहे. बंधाऱ्यात अडवलेल्या पाण्यावर मार्च व एप्रिल महिन्यापर्यंत परिस्थिती बरी होती. पण आज स्थिती बिकट आहे. म्हणून लाटीपाडा धरणातून पाण्याचे आवर्तन प्रवाहीत करून ८ नंबर चारीद्वारे पाणी सोडावे, यासाठी मलांजन ग्रा. पं. पदाधिकारी, साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे, उभरे गावचे सरपंच, शरद सोनवणे आदींनी उपअभियंता, सिंचन विभाग, पिंपळनेर यांना निवेदन दिले आहे.

अनिल गोटे यांचा आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा,उद्या भरणार लोकसभेसाठी अर्ज

धुळे दि.०८(प्रतिनिधी): ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा आज सोमवारी राजीनामा दिला असल्याचं सुत्रांमार्फत समोर येत आहे. धुळे महानगरपालिका पासून नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी अखेर आज आमदारकी सह भाजप पार्टीच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.अनिल गोटे उद्या मंगळवारी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल करणार आहेत.

आपण आजही मोदिंचे समर्थक असून माझा केवळ मोदींच्या नावाने वाईट उद्योग करणाऱ्यांना विरोध असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले. आपल्या आमदारकीचा राजीनामा देताना अनिल गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली. पक्षा अंतर्गत राजकारणाचा कंटाळा आल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली पण त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे समजते. गोटे यांनी याआधी अनेक वेळा त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.आज अनिल गोटे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.भामरे-गोटे-काँग्रेसचे कुणाल पाटील पाटील अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.