लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा

लातूर (प्रतिनिधी) दि.१३: सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरूणींना वर्षाकाठी दोन कोटी नौकऱ्या देवू म्हणाऱ्या नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.बाबासाहेब पाटील साहेब, प्रदेश सचिव संजय बनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, बबन भोसले, प्रदेश सदस्य सोमेश्वर कदम, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जि.प. गटनेते मंचकराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवानंद हेंगणे, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब टाकळगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रामभाऊ नरवटे, जिल्हा सरचिटणीस गोविंद गिरी, तालुकाध्यक्ष अर्जून आगलावे, जळकोट युवक तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, जि.प. सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष नबीभाई सय्यद, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अॅड. आशिष वाघमारे, माजी जि.प. सदस्य सुदर्शन मुंडे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, यांच्यासह यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते.


राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *