पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना तडीपार संबोधून गंभीर आरोप करून देखील धनंजय मुंडे विषयी महाराष्ट्र भाजपचे नेते,प्रवक्ते गप्प का?

मुंबई: विधान परिषदेत भाजपाच्या मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या धनंजय मुंडे विरुद्ध न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.आरोप करून भाजप सरकारच्या मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या धनंजय मुंडें विरुद्ध गुन्हा दाखल होत असताना भाजपा मात्र याप्रकरणी गप्प दिसत आहे.सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.राज्य सरकारच्या सोळा मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या धनंजय मुंडे विरुद्ध गुन्हा दाखल होत असताना भाजपाच्या गोटात मात्र कमालीची शांतता पसरली आहे.

राज्यातील भाजपचे प्रवक्ते गप्प का ?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना तडीपार म्हणनाऱ्या धनंजय मुंडे विरुद्ध खुद्द न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना भाजपाच्या एकाही नेत्याने अथवा प्रवक्त्याने मुंडेंविरोधात एका शब्दानेही आवाज उठवला नाही.न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल होत असताना भाजपा मात्र याविषयी मूग गिळून गप्प बसली आहे. राज्य सरकार विरोधात विधान परिषदेचे कामकाज बंद पाडून राज्य सरकारची लक्तरे वेशीला टांगणाऱ्या धनंजय मुंडेंना भाजपा व भाजपाचे नेते प्रवक्ते विरोध करताना दिसत नाहीत याचा अर्थ काय ?

राज्यातील भाजपच्या प्रवक्त्यांना धनंजय मुंडेंचा पुळका?

केवळ ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात आरोप करणे या एकमेव कारणाने विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची उबवणाऱ्या धनंजय मुंडे विरोधात भाजपाईंची दातखीळ का बसली असावी.मागच्या एका अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे हे आर्थिक “सेटलमेंट” करून विधान परिषदेत कुणाविरुद्ध आवाज उठवायचा अथवा दाबायचा ते ठरवतात.त्यांच्या विरोधात खुद्द न्यायालय गुन्हा दाखल करण्याचा आदेश देते आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मात्र यावर अवाक्षर ही काढले जात नाही.सत्ताधारी पक्षांना आणि त्यांचा सो कॉल्ड प्रवक्त्यांना पक्षाच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या व्यक्तीचा पुळका आहे का ?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *