अंबाजोगाई तालुकासामाजिक

कै.ञ्यंबक आसरडोहकर उत्कृष्ट पञकारीता पुरस्काराने अतुल कुलकर्णी सन्मानित

साहित्यिक हा समाजाचा शिल्पकार असतो-प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) कै.त्र्यंबक आसरडोहकर आज हयात असते तर ते महाराष्ट्रातले मोठे विनोदी लेखक झाले असते कारण त्यांच्याकडे लिखान व मानसांविषयी मोठी निष्ठा होती.त्यांनी नौकरी सोडून आपले जीवन साहित्य आणि पत्रकारीतेसाठी वेचले होते.दुःखातही हसविणारा मिष्कीलपणा आसरडोहकरांकडे होता.त्यांनी मध्यमवर्गीय जीवनाचे सत्य आपल्या लेखणीतून मांडले. पत्रकारांनी नेमके व परखडपणे लिहिले पाहिजे व्यवस्थेविरूद्ध भूमिका मांडली पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक व विचारवंत प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे यांनी केले.ते अंबाजोगाईत कै.त्र्यंबक आसरडोहकर स्मृती समारोहात बोलत होते. दै.महाराष्ट्र टाइम्सचे बीड जिल्हा प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांना या वर्षीचा कै.ञ्यंबक आसरडोहकर उत्कृष्ट पञकारीता पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

अंबाजोगाई येथे दि. 17 फेब्रुवारी,रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता.लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पञकार अमर हबीब तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव, प्रा.डॉ.वासुदेव मुलाटे व पुरस्कार प्राप्त पत्रकार अतुल कुलकर्णी, आसरडोहकर प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा किरण देशमुख आसरडोहकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना भास्कर चंदनशीव यांनी यावेळी कै.त्र्यंबक आसरडोहकर यांनी मानसे जोडण्याचे काम केले.दुःख पचविण्याची व प्रसंगी दुःखाला हसवण्याची प्रचंड ताकद आसरडोहकर यांच्यामध्ये होती.प्रसंगी त्यांनी स्वतःवरच विडंबण करून विनोद निर्मिती केली.कष्ट करणार्‍या माणसाला जगण्याचा मार्ग दाखविणारा लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन चंदनशीव यांनी केले.सत्काराला उत्तर देताना अतुल कुलकर्णी यांनी यावेळी हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगुन गेल्या 20 वर्षांपासुन आपण पत्रकारीतेत कार्यरत आहोत.आज पञकारीता करताना चौफेर बाजूने अडचण असूनही तसेच लाठी आणि काठी शिवाय हल्ली कोणी बोलत नाही.अशा काळात मी पञकार म्हणून माझे कर्तव्य कदापीही विसरणार नाही.मौनाची एक भाषा आहे. पत्रकारिता दबणार नाही.मी प्रामाणिकपणे पत्रकारीता करीत राहणार असून या पुरस्काराने आपण धन्य झालो आहोत.आज आसरडोहकरांचे कार्य ऐकून आपण प्रभावित झालो आहेत. अंबाजोगाई ही सांस्कृतिक भूमी आहे. या भूमिने आपल्याला खुप काही दिले आहे असे सांगुन अतुल कुलकर्णी यांनी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार मानले.प्रारंभी प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पञकार किरण आसरडोहर यांनी सांगितले की, आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने पञकारीता क्षेञात उल्लेखनिय कार्य करणा-या मान्यवर पञकार व पञकारीता क्षेञातील युवा प्रतिभांना सन-2010 पासून हा पुरस्कार दिला जातो.यापुर्वी हा पुरस्कार पञकार सय्यद दाऊद,दत्ताञय देशमुख,श्रावणकुमार जाधव,अभिजीत गाठाळ,गोविंद शेळके, कलीम अजीम,संदीप सोनवळकर आदींना प्रदान करण्यात आलेला आहे.आज आठवा पुरस्कार अतुल कुलकर्णी यांना प्रदान करीत आहोत.ग्रामिण साहित्याच्या क्षेत्रात कै.त्र्यंबक आसरडोहकर यांनी मोठे काम केले आहे. त्यांना जावून 31 वर्ष झाली.त्यांची आठवण सदैव जनमाणसांच्या मनात रहावी यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांनी अंबाजोगाई शहराचे वेगळेपण नमुद करून सामाजिक एकोपा ठिकविणारे हे शहर आहे.कै.त्र्यंबक आसरडोहकर यांच्या नावाने आसरडोहर ग्रामपंचायतीने ठराव घेवून कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे. गावचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या विषयी गावाला अभिमान असला पाहिजे असे सांगुन कै.त्र्यंबक आसरडोहकर यांच्या ग्रामिण साहित्याविषयी आपले मौलीक विचार अमर हबीब यांनी प्रकट केले.कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलन व कै.त्र्यंबक आसरडोहकर यांच्या प्रतिमापुजनाने झाली मान्यवरांच्या हस्ते पत्रकार अतुल कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह,फेटा,शाल, श्रीफळ,पुष्पहार व पुष्पगुच्छ व 2001/- रूपये रोख असे होते. प्रारंभी पुलवामा भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कु.निकीता व कु.तेजल यांनी स्वागतगीत सादर केले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहा निर्मळे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय करून उपस्थितांचे आभार रेखा शितोळे यांनी मानले.या कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक प्रा.नानासाहेब गाठाळ,डॉ.सिद्धेश्वर बिराजदार,डॉ.श्रीहरी नागरगोजे,डॉ.अलका वालचाळे,विश्वांभर वराट,प्रशांत बर्दापुरकर,अभिजीत गाठाळ,प्रकाश लखेरा, गणपत व्यास,दत्तात्रय दमकोेंडवार,परमेश्वर गित्ते,सुदर्शन रापतवार, पुष्पा बगाडे,जगन सरवदे,सय्यद दाऊद, एस.बी.सय्यद,शिवरूद्र अकुसकर,अनंत चव्हाण,आशा अमर हबीब,सौ.राजश्री अतुल कुलकर्णी,मुजीब काझी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कै.त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठाण व आसरडोहकर परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button