अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शहरातील प्रशांतनगर भागातील सहकार भवन येथे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार,दिनांक 18 जुलै रोजी दोन्ही महापुरूषांना अभिवादन आणि प्रतिमापुजन करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.तसेच महापुरूषांच्या विचारांचा जागर करण्यात आला.याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृतीदिन आहे.लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे समाजिक,सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील कार्य हे अत्यंत मौलिक आहे.समाजातील वंचितांचे दुःख साहित्यातून शब्दांकित करून समाजवादी भूमिका स्पष्टपणे रेखाटली,मार्क्सवादी भूमिका समाजाभिमुख केली. ज्यामुळे शोषित व वंचित घटकांत अस्मितेची जाणीव निर्माण होवून समाजाभिमुख समाजनिर्मितीसाठी साहित्यमुल्य सांगितले.तर संत नामदेव महाराज यांची आज पुण्यतिथी आहे.वारकरी संप्रदाय संत नामदेव महाराज यांना संत शिरोमणी मानतो.तत्कालीन प्रतिकूल परिस्थिती मध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले.’नाचू कीर्तनाचे रंगी,ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.भागवत धर्माचे एक आद्यप्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला.संत नामदेव महाराज हे कीर्तने व जनप्रबोधन करीत संपुर्ण भारतभर फिरले.संत नामदेव महाराज यांचा शिष्य संप्रदाय सर्वञ आढळून येतो.अशा महान संतांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीने पुढे चालवावा अशी अपेक्षा राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली.यावेळी सुञसंचालन करून उपस्थितांचे आभार विजय रापतवार यांनी
मानले.याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा,राजीव गांधी पंचायतीराज संघटनेचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,बीड जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष प्रवीण संगेवार,रमेश सुरेवार,भारत जोगदंड,सचिन जाधव हे उपस्थित होते.