Offer

सोयगाव फर्दापूर रोडवर इंडिका कार,रिक्षा व मोटार सायकल तिहेरी अपघात ; ३ जण गंभीर जखमी

सोयगाव (ज्ञानेश्वर धोंडू पाटील) दि.४ :सोयगाव फर्दापूर रोडवर इंडिका कार,अँपे रिक्षा व मोटार सायकल तिहेरी अपघात झाला यात तिघे गंभीर जखमी झाले.काल(दि.३)रात्री हि घटना घडली.यातील इंडिका कार व मोटार सायकल पेटवून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली.याप्रकरणी इंडिका कार चालकांवर व वाहन पेटवली म्हणून अज्ञाताविरुध्द सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोयगाव ते फर्दापूर रोडवर गोगडी धरण फाट्यावर सोयगाव कडून फर्दापूर कडे जाणाऱ्या इंडिका व्हिस्टा कार क्र.एम एच-१८,डब्लू-२४७९ हि भरधाव वेगाने जात असतांना फर्दापूर कडून येणाऱ्या अँपे रिक्षा एम.एच-१९,जे-१३३७ हिस जोरदार धडक दिली पाठीमागून येणारी मोटार सायकल क्र एम एच २० इव्ही- ७३५५ हि रिक्षाला धडकली यात दुचाकी वरील श्रीराम दारासिंग चव्हाण(वय २७),सोण्द्रीबाई उखा राठोड,व रामेश्वर सांडू राठोड (सर्व रा.जंगलातांडा ता.सोयगाव )हे गंभीर जखमी झाले असून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत आहे. याप्रकरणी श्रीराम दारासिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून इंडिका कार चालक सुनिल उत्तम जंजाळ (रा.जामनेर.जि जळगाव ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री अपघात झाल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास अपघात ग्रस्त इंडिका कार आणि मोटार सायकल जळत असल्याचे आढळून आले.जळालेल्या वाहने पाहून सोयगाव शहरात एकच खळबळ उडाली बघण्यासाठी एकच गर्दी झाली.याप्रकरणी इंडिका कार चालक सुनिल उत्तम जंजाळ यांच्या फिर्यादीवरून कार पेटवून देणाऱ्या अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शैख शकील ,पोलीस उपनिरीक्षक एस एस रोडगे अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button