सोयगाव:आठवडा विशेष टीम― जून-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खरिपाच्या पिकांचे पंचनाम्यांचे आदेश कृषी,महसूल आणि पंचायत समितीच्या कार्यालयांना तीन दिवसापूर्वीच धडकले असतांनाही शुक्रवारी,शनिवार आणि रविवार या तीन दिवसाच्या कालावधीत पंचनाम्यांची कामे तालुका प्रशासनाच्या यंत्रणांनी हाती घेतले नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.पंचनामे होत नसल्याने आठवडाभरापासून बाधित पिके नुकसानीच्या चक्रात अडकून आहे.
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना अति पावसात नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी थेट शेतावर जाण्याचे आदेश निर्गमित केले आहे.परंतु आदेश मिळूनही यंत्रणांची पंचनाम्यांची तयारी नसल्याचे शुक्रवारी आढळून आले असून एकही संयुक्त पंचनाम्याचे पथक शेती शिवारावर धडकले नव्हते.सोयगाव तालुक्यात मुग,उडीद,मका सोयाबीन,कपाशी,ज्वारी,आणि बाजरी यासह इतर पिकांचे अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे.या अतिवृष्टीत पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्यात उभी होती तर काही पिकांची माती झालेली आहे.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात थेट शेतावर प्रत्यक्ष पंचनामे मोहीम राबविण्याचे आदेश दिलेले आहे.सोयगाव तालुक्यात या अतिवृष्टीत खरिपाच्या पिकांचे ६० टक्के नुकसान झाले आहे.यामध्ये मुग,उडीद या कापणीवर आलेल्या पिकांना कोंब फुटले आहे.सोयाबीन शेतातच कुजले असून कपाशी पिकांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकांचा रंग लालसर होवून कैऱ्या गळाल्या आहे.अशी स्थिती सोयगाव तालुक्यातील पिकांची असतांना मात्र अद्यापही आदेश मिळूनही पंचनामे हाती घेण्यात आलेले नसून तालुका प्रशासनाच्या यंत्रणांना अद्याप पंच्नाम्यांचा मुहूर्त सापडलेला नाही.
चौकट-पंचनाम्यात ३३ टक्क्यांचा निकष….परंतु सरसगट नाही………..
पंचनाम्यात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा निकष आहे.त्यामुळे सरसगट पंचनामे होणार नसल्याने गावनिहाय नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून पंचनामे हाती घेण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे सरसगट पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चौकट-सुटीचे ग्रहण—
शनिवार आणि रविवार दोन दिवस शासकीय सुट्या असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्यामुळे पंचनामे रखडले असून यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा सुट्या महत्वाच्या आहे असे स्पष्ट झाले आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकून तीन दिवस झालेले असतांना प्रशासनाने अद्यापही पंचनाम्यांचे नियोजन केलेले नाही.त्यामुळे स्थिती अवघड झालेली आहे.पंचनाम्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचे चित्र सोयगाव तालुक्यात दिसत आहे.
१)जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनाम्यांचे आदेश प्राप्त आहे त्यासाठी कृषी विभागाकडून तालुक्यातील संबंधित कृषी सहायकांना गावनिहाय बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संकलित करण्याच्या सूचना देण्यात येवून शासन निकषांनुसार थेट शेतावर जावून पंचनामे करण्याचे सांगितले आहे.
―अरविंद टाकनकर
तालुका कृषी अधिकारी सोयगाव