अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यात गुरूवारी दुपारी साडे चार वाजता झालेल्या जोरदार वा-याचे रूपांतर चक्रीवादळात झाले.पाऊस आणि चक्रीवादळामुळे देवळा,अकोला व तडोळा येथील ऊस आणि सोयाबीन सह इतर सर्व पिके ही भुईसपाट झाली आहेत.ऊसासह विविध पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.नुकसानग्रस्त शिवारांची प्रत्यक्ष शिवार पाहणी दौरा करून तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
रविवार,दिनांक 6 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परीषदेचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांचेसह तालुका कृषी अधिकारी ठाकूर, तहसिलदार यांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी ए.एन. शेख,कृषी विस्तार अधिकारी आर.डी.बर्वे,सुपरवायझर ढाकणे,कापसे, कृषी सहाय्यक मागाडे,तलाठी हिबाणे,तलाठी रानमारे,सरपंच नानासाहेब यादव, श्रीनिवास आगळे, गुणवंतराव आगळे, राजेभाऊ आगळे, अशोक शितोळे,प्रसाद पवार,शरदबापू पवार आदींनी देवळा, अकोला आणि तडोळ्यातील प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला.
शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी-जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांची मागणी
देवळा,अकोला आणि तडोळा ही तीन गावे मागील दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत आहेत.असे असताना यावर्षी सुगीचे पीक चांगले आले होते.परंतु,त्यात ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर मोठे संकट या चक्रिवादळाचे निमित्ताने ओढवल्याने शेतक-यांचे कधीही न भरून येणारे एवढे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीची टक्केवारी तब्बल 70 ते 80 टक्के एवढी आहे. त्याप्रमाणेच नुकसानीचे पंचनामे झाले आहेत या दोन तीन गावात चक्रीवादळामुळे हाती आलेले शेती उत्पादन नष्ट झाले आहे.ऊस भुईसपाट झाला आहे. तसेच सध्या साखर कारखाने सुरू नसल्याने सदर ऊस कुठेही विक्रीस देता येत नाही.साखर कारखाने सुरू होण्यासाठी अद्यापही दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आहे.अशा वेळी या भागातील शेतक-यांना शासनाने अकस्मात निधीतून तात्काळ मदत करावी.पिकांची नुकसान भरपाई द्यावी.सर्व अधिकारी यांचेसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी दौरा केला. रितसर पंचनामे केले आहेत.दोन ते तीन दिवसांत अहवाल तयार करून शासनाकडे पाठवला जाईल.सरकारने मदत केल्याशिवाय येथील शेतकरी बांधव हे सावरणार नाहीत. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी देवळा, अकोला व तडोळा येथील शेतक-यांच्या वतीने चक्रीवादळामुळे ऊस भुईसपाट झालेल्या शेतक-यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
