परळी:अशोक देवकते― वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि हॉस्पिटल मध्ये रुग्णांची झालेली वाढ, तसेच ब्लड बैंक मध्ये झालेला रक्त तुटवडा व गरीब आणि गरजूसाठी दर दिवसाला रक्ताची आवश्यकता असते. रक्ताची वाढती मागणी पाहता व तसेच गरजू व्यक्तींना मोफत रक्त मिळावे या उद्देशाने विधान परिषद सदस्य मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने अंबाजोगाई तालुक्यातील गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांतर्फे गुरूवार १ ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय , अंबाजोगाई येथे दुपारी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते कोरोनाचे संकट असताना सुद्धा लोकसेवेसाठी अंबाजोगाई येथील लोकांनी रक्तदान करून शिबिरास चांगला प्रतिसाद दिला.योग्य ती काळजी घेत सोशल डिस्टेनसिंग पाळून, सर्व रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत रक्तदान शिबीर व्यवस्थित पार पाडण्यात आले. रक्तदान शिबिरांचे आयोजक संदिप काजगुंडे युवा मल्हार सेना तालुकाध्यक्ष बापू शिंपले .अजित काळे .नितीन काळे प्रशांत हेडे अप्पा काळे सह आदी कार्यकर्ते, उपस्थित होते आणि सर्व रक्तदात्यांचे या कोरोना काळात सुद्धा त्यांनी केलेल्या रक्तदानासाठी युवा नेते शिवदास बिडगर संदिप काचगुंडे अंबाजोगाई यांनी विशेष आभार मानले.
0